शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराह 'नंबर १'! कसोटी क्रमवारीत विराट, यशस्वीची मोठी झेप; रोहित, पंत, गिलची घसरण
2
"मुलगी जर दिसायला चांगली असेल..."; अजितदादा समर्थक आमदाराचे महिलांबाबत वादग्रस्त विधान
3
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासह बड्या नेत्यांचा खात्मा करणार, इराणने प्रसिद्ध केली मोस्ट वाँटेडची यादी
4
“आरक्षण वाचवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीला सत्तेत निवडून द्या”; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन
5
कमी तिथे आम्ही नव्हे, तर भारत म्हणजे 'हमी'! पुतिन यांच्यानंतर अजित डोवाल फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना भेटले; कारण काय?
6
"...मग मनोज जरांगेंनी आधी तिथला उमेदवार जाहीर करावा", लक्ष्मण हाकेंचे चॅलेंज काय?
7
बांगलादेशवर मोठा विजय मिळवत 'कॅप्टन' रोहित शर्माचा विक्रम, विराट कोहलीला टाकलं मागे
8
लीड रोड करुनही झाली नाही लोकप्रिय; १० मिनिटांच्या 'त्या' भूमिकेने केलं स्टार, आता म्हणते...
9
'या' चुका तुम्हाला करतील कर्जबाजारी; 5 गोष्टी समजून घ्या
10
Palak Sindhwani: गुडबाय! 'तारक मेहता...' मधील सोनूचा मालिकेला रामराम; शेअर केली भावूक पोस्ट
11
मनोज जरांगेंनी कंबर कसली; दसरा मेळाव्याची सुरु केली तयारी, विविध ठिकाणी देणार भेटी
12
Irani Cup live : कडक सॅल्युट! सर्फराज खानचे अप्रतिम 'द्विशतक', मुंबईचा 'संकटमोचक' लै भारी लढला
13
धक्कादायक! झारखंडमध्ये रेल्वे ट्रॅकला बॉम्बने उडवले; भीषण स्फोटाने परिसर हादरला
14
ऑनलाईन गेमच्या नादात सेल्समन बनला चोर; शोरुममधील ७ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला
15
गोविंदाप्रमाणेच बॉलिवूड अभिनेत्रीच्या पतीलाही स्वत:च्याच बंदुकीतून लागली होती गोळी, लग्नानंतर ११ दिवसांतच उद्ध्वस्त झालेला संसार
16
"काँग्रेसनं लबाडीच्या राजकारणामुळं स्वतःला संपवलं", मनोज तिवारींचा जोरदार हल्लाबोल
17
“मोदी सातत्याने महात्मा गांधींचे नाव घेतात, पण अहिंसेचे पालन करत नाहीत”; काँग्रेसची टीका
18
इस्रायलसोबत युद्ध सुरू असतानाच इराणचं मोठं विधान; म्हणाला- नेतन्याहू या शतकातील 'नवा हिटलर, तर भारत..."
19
“भाजपाने आधीच हार मानली, २०२४ च्या विधानसभेला मविआचेच सरकार येणार”; नाना पटोलेंचा दावा
20
Gold Price Review: सोन्यापेक्षा चांदी अधिक महागली, महिन्याभरात ७१०२ रुपयांनी वाढली किंमत; कारण काय?

भोसेमध्ये दोनशेहून अधिक जणांना जेवणातून विषबाधा

By admin | Published: December 19, 2015 12:45 AM

वास्तुशांतीच्या जेवण

भोसे : भोसे (ता. मिरज) येथे शुक्रवारी वास्तुशांतीच्या जेवणातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा झाली. सायंकाळनंतर दुर्घटनेची तीव्रता वाढल्यानंतर वैद्यकीय पथक तातडीने गावात दाखल झाले आहे. विषबाधा झालेल्या रुग्णांवर मिरज येथील शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भोसे येथे बाळासाहेब माळकर यांनी नवीन घर बांधले आहे. शुक्रवारी घराची वास्तुशांती होती. या कार्यक्रमासाठी ग्रामस्थांसह नातेवाईक, मित्रपरिवाराला निमंत्रण दिले होते. सुमारे १२०० जणांसाठी भोजन बनविण्यात आले होते. भोजनात बासुंदी-पुरीचा बेत होता. दुपारी बारा ते चार या वेळेत पंगती उठल्या. मात्र, जेवणानंतर लोकांना उलटी व पोटात मळमळण्याचा त्रास सुरू झाल्याने विषबाधा झाल्याचे लक्षात आले. सायंकाळनंतर विषबाधेचे रुग्ण वाढू लागले. सुरुवातीला पन्नास-साठच्या घरात असणारा विषबाधेच्या रुग्णांचा आकडा रात्री दोनशेच्या घरात गेला. ही संख्या केवळ गावातील रुग्णांची होती. परगावाहून आलेल्यांनाही विषबाधा झाल्याची भीती व्यक्त होत असून, त्यांची संख्या समजू शकली नाही. सुरुवातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक दाखल झाले. त्यानंतर तालुक्याच्या आरोग्य पथकालाही पाचारण करण्यात आले. रात्री आठच्या दरम्यान ‘१०८’ क्रमांकाच्या रुग्णवाहिका मागवण्यात आल्या. शिवाय मिरज येथून खासगी रुग्णवाहिकाही मागवण्यात आली. विषबाधा झालेल्या रुग्णांवर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना मिरजेच्या शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. विषबाधा कोणत्या कारणाने झाली, हे रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. (वार्ताहर)