अंगापूर : ग्रामीण भागातील जनतेला सर्व सोयी-सुविधायुक्त प्रशस्त असणारे मोरया कोविड सेंटर कोरोना रुग्णांना वरदान ठरेल, असे प्रतिपादन पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळिंबकर यांनी केले.
टॉप गीअर यांच्या माध्यमातून सातारा तालुक्यातील देशमुखनगर येथील सातारा तालुक्यातील देशमुखनगर येथे पन्नास बेडचे सुसज्ज कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. या कोविड सेंटरच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी देशमुखनगरचे सरपंच संपत देशमुख, वेणेगाव सरपंच विठ्ठल सावंत, फत्यापूर सरपंच अमोल घाडगे, लिंबाचीवाडी सरपंच रामदास कणसे, चंद्रहार माने, श्रीकांत पवार, प्रवीण धस्के पत्रकार संघाचे अध्यक्ष विकास जाधव, सतीश जाधव, प्रताप भोसले, धनाजी कणसे, किरण पवार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होते. यावेळी बोलताना डाळिंबकर म्हणाल्या, ‘सध्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने अनेक ठिकाणी रुग्णांना बेड मिळवण्यासाठी खूप त्रास होत आहे. तसेच उपचारासाठी नातेवाइकांना धावाधाव करावी लागत आहे. अशा वेळी ग्रामीण भागातील आपल्या परिसरातच असे विलगीकरण कक्ष सुरू झाल्याने लगतच्या अनेक गावांतील जनतेला मोलाची मदत होणार आहे. हा परिसर सुसज्ज आणि मोकळ्या वातावरणामुळे रुग्णांना याचा निश्चित फायदा होईल.
फोटो : ०८ संदीप कणसे
सातारा तालुक्यातील देशमुखनगर येथील मोरया कोविड सेंटरचे उद्घाटन पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळिंबकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. (छाया : संदीप कणसे)