सातारा : शाळांनी दहावीचा निकाल राज्य शिक्षण मंडळाकडे सादर करण्याची मुदत संपत आली असतानाच जिल्ह्यातील बहुतांश शाळांनी गुणदानाचा टप्पा पूर्ण केला आहे. कोविडचे निर्बंध लक्षात घेता काही शाळा मात्र मुदतवाढीच्या प्रतीक्षेत आहेत.
राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल वेळेत लावण्यासाठी सोपवण्यात आलेल्या कामकाजासाठी राज्यातील शिक्षक आणि मुख्याध्यापकांकडे थोडाच कालावधी उरला आहे. या उरलेल्या दिवसांत विद्यार्थ्यांना देण्यात येणारे गुण, त्यासाठी मंडळाकडून आलेले संपूर्ण नियोजन पूर्ण करायचे आहे. तर त्यासाठी शिक्षकांनी त्यांना दिलेल्या वेळापत्रकानुसार कामकाज सुरू ठेवले आहे. त्यात अनेक तांत्रिक अडचणींचा सामना शिक्षकांना करावा लागला आहे.
विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा लागली असून, आपले निकाल कधी येतात, अभ्यासू व हुशार विद्यार्थ्यांना किती गुण मिळतील, याचीदेखील उत्सुकता आहे. दहावीची परीक्षा झाली नाही. मात्र, परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांनी संपूर्ण तयारी केली व कोरोना काळातही परीक्षेला सामोरे जाण्याची तयारी ठेवली होती. यात परीक्षा कधी होणार याचे वेळापत्रकही जाहीर होत नव्हते व परीक्षा होणार की नाही, हेदेखील स्पष्ट होत नव्हते. अखेर परीक्षा होणार नसल्याचे जाहीर झाले व विद्यार्थ्यांना गुण देण्यासाठी प्रत्येकाचे गुण सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. याचप्रमाणे बारावीच्या निकालाचाही विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे.
.....
पॉर्इंटर
दहावी विद्यार्थ्यांची संख्या :
निकाल पूर्ण करण्यासाठी सुरूय लगबग
१. त्यांच्या स्तरावर गुणांचे विभाजन करून सूत्रांमध्ये बसवण्यिाचे काम सुरू आहे. मात्र, मनुष्यबळाचा अभाव, याच काळात विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग घेणे या सर्वात जास्त वेळ जात आहे. त्यामुळे निकालाचे काम वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी शिक्षकांची धावपळ सुरू आहे.
२. राज्यातील बहुतांश शाळांनी गुणदानासह इतर प्रक्रिया अद्याप पूर्ण केलेली नाही. त्यामुळे निकालाच्या कामासाठी मुदत देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
३. यंदाचा निकाल कसा असेल, याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच निकालाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण न केल्यास त्यास शाळा जबाबदार असणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
कोट :
गुणदानाबाबत शिक्षकांच्या अडचणी
सातारा जिल्ह्यातील जावळी, महाबळेश्वर आणि पाटण येथील बहुतांश भागात इंटरनेट कनेक्शन मिळविण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे येथील निकाल तयार करण्यापेक्षा तो अपलोड करणं अधिक जाचक ठरलं.
-
कोविडमुळे काही पालक गावाकडे स्थलांतरित झाले. दहावीत स्थलांतरित झालेल्या विद्यार्थ्यांचे नववीतील गुणपत्रक पूर्वीच्या शाळेतून प्राप्त करण्यासाठी पालकांना विलंब लागला. परिणामी शाळांना या विद्यार्थ्यांसाठीही त्यांचा निकाल बोर्डाकडे जमा करता आला नाही.
कोट..
जिल्ह्यातील बहुतांश शाळांची गुणदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. याची माहिती काही शाळांनी अपलोडही केली आहे. उर्वरित शाळांचे काम वेगाने सुरू व्हावे, याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. शाळांच्या अडचणी समजून घेऊन त्यानुसार कार्यवाही करणे सुरू आहे.
- प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी