शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

सर्वाधिक वृक्ष लागवड फलटणमध्ये...

By admin | Published: June 29, 2016 10:32 PM

जिल्ह्यात पावणे सात लाख झाडे : वाई तालुक्यात सर्वात कमी लागण होणार

सातारा : हरित महाराष्ट्राची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी दुष्काळी असणाऱ्या फलटण तालुक्यात सर्वाधिक एक लाखाहून अधिक तर माणमध्ये ९८ तर खटावमध्ये ९१ हजारांवर वृक्षाची लागवड करण्यात येणार आहे. तर संपूर्ण जिल्ह्यात ६ लाख ७८ हजार झाडे लावण्यात येणार आहेत. जागतिक तापमानात होणारी वाढ रोखणे व त्यामुळे होणाऱ्या पर्यावरणीय बदलाची तीव्रता कमी करणे, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी करावयाच्या उपायोजनांचा भाग म्हणून राज्य शासनाचे विविध विभाग व जनतेच्या सहभागातून वनमहोत्सव कालावधीमध्ये दि. १ जुलै रोजी राज्यात २ कोटी वृक्ष लागवड करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. विविध यंत्रणांच्या व जनतेच्या सहभागातून हरित महाराष्ट्राची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी १ जुलै रोजी सातारा जिल्ह्यातही ६ लाख ७८ हजार २३० वृक्षलागवड करण्यात येणार आहे. वन विभागामार्फत ५३ साईटस्वर ४ लाख ६० हजार ६००, सामाजिक वनीकरण विभागामार्फत २७ साईटवर ३० हजार तर इतर शासकीय विभाग व स्वयंसेवीसंस्था यांच्यामार्फत ६७० साईटवर १ लाख ८७ हजार ६३० रोपांची लागवड करण्यात येणार आहे.वन विभागामार्फत माण तालुक्यातील ९८ हजार, कऱ्हाड- ४२ हजार ५००, खंडाळा- १० हजार, कोरेगाव- ६६ हजार ८००, पाटण- १५ हजार ७००, फलटण- १ लाख १५ हजार १००, सातारा- १३ हजार ३००, खटाव- ९१ हजार २०० व वाई तालुक्यात ८ हजार या प्रमाणे झाडे लावण्यात येणार आहेत. या वृक्षलागवडीमध्ये सहकारी साखर कारखाने, औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या, विविध संस्था, पर्यावरण प्रेमी १ जुलै रोजी होणाऱ्या वृक्षलागवडीत मोठ्या संख्येने सहभाग घेणार आहेत.जिल्ह्यात वृक्षारोपणाच्या विविध कार्यक्रमातून अधिकाधिक झाडे लावून जिल्ह्यात वृक्षारोपणाची लोकचळवळ निर्माण करण्यात सर्वांनीच सक्रिय होणे काळाची गरज आहे. वृक्ष लागवडीअंतर्गत जिल्ह्यात विविध शासकीय-निमशासकीय यंत्रणांबरोबरच जनतेनेही या वृक्षलागवडीत सक्रिय सहभाग नोंदविणे गरजेचे आहे. स्वयंसेवी-सेवाभावी, सहकारी संस्था, मंडळे, विद्यार्थी आणि तरुणांनी सहभागी होणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी) प्रत्येकाने योगदान देणे गरजेचे... वृक्षलागवड मोहिमेत प्रामुख्याने वन आणि सामाजिक वनीकरण विभागाबरोबरच जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तसेच अन्य शाखांतील विद्यार्थ्यांनी किमान पाच ते दहा झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प करण्याची गरज आहे. जनतेने आपल्या घराजवळील, शिवारातील आणि गावातील मोकळ्या जागेत जास्तीत जास्त झाडे लावावीत. महाराष्ट्र शासनाच्या या महत्त्वाकांक्षी पर्यावरणपूरक अशी लोक चळवळ यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने योगदान देणे महत्त्वाचे आहे.