शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
4
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
5
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
6
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
8
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
9
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
10
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
11
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
12
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
13
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
14
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
15
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
16
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
17
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
18
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
19
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
20
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न

किडनी देऊन आईने मुलाला दिले जीवदान..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 12:25 AM

स्वत:ची किडनी देऊन मुलाच्या भविष्याचा विचार करणाऱ्या पद्मिनी पांडुरंग देवकर यांचा आदर्श सर्व माता-भगिनींनी घ्यावा तेवढा थोडाच आहे. ‘आई’ या शब्दात किती महान असा विचार सामावला आहे. आई माझा गुरू, आई कल्पतरू हे म्हणताना फार गोड वाटते. आईविना हे जग सुने आहे. ममतेने ओतप्रोत भरलेल्या मातेच्या मुलांच्या बाबतीत

- नम्रता भोसले, खटाव

स्वत:ची किडनी देऊन मुलाच्या भविष्याचा विचार करणाऱ्या पद्मिनी पांडुरंग देवकर यांचा आदर्श सर्व माता-भगिनींनी घ्यावा तेवढा थोडाच आहे. ‘आई’ या शब्दात किती महान असा विचार सामावला आहे. आई माझा गुरू, आई कल्पतरू हे म्हणताना फार गोड वाटते. आईविना हे जग सुने आहे. ममतेने ओतप्रोत भरलेल्या मातेच्या मुलांच्या बाबतीत अनेक कल्पना असतात. कोणत्याही स्त्रिला आपल्या मुलांचे हित तसेच मुलांना सुखी ठेवताना जो आनंद होते तो अवर्णनीयआहे. आपल्या मुलाला साधा काटा टोचला तरी जिच्या डोळ्यात पाणी उभे राहते ती माउली ज्यावेळी आपल्या मुलावर कठीण प्रसंग येतो, त्यावेळी आपला जीवही धोक्यात घालायला मागेपुढे पाहत नाही. अशाच पद्मिनी देवकर या मातेच्या जीवनाविषयी..

माण तालुक्यातील माही या लहानशा गावात आपले पती पांडुरंग देवकर यांच्याबरोबर वास्तव्यास असणाºया देवकर दाम्पत्याला दोन मुले व एक मुलगी. शेतकरी कुटुंब.शेती व्यवसायावर आपला उदरनिर्वाह करत असताना शेतीला जोड दुग्ध व्यवसाय करत आपल्या तिन्ही मुलांना चांगले शिक्षण देऊन त्याचे हित पाहत त्यांना नोकरी, व्यवसायात स्थिर केलेआहे.

देवकर यांच्याकडे असणारी शेती ही जिरायती शेती असल्याने पावसाच्या बेतावर शेतातून जेवढे पीक निघेल, त्यातच समाधान मानणाºया या सुखी कुटुंबाचा प्रवास चांगला सुरू असतानाच २०१६ मध्ये या कुटुंबाला एका नवीनच समस्येने घेरले आणि कुटुंबामध्ये अस्थिरता आली.मोठा मुलगा अमोल नोकरीनिमित्त पुण्यामध्ये असतो. मुलगी मुंबईत असते, तर दुसरा मुलगा अविनाश हा वडिलांच्या बरोबर शेती पाहत छोटी-मोठी कामे गावातच करत असे.

२०१६ मध्ये अविनाशला अचानक डोके दुखून चक्कर येण्याच्या घटनांना सामोरे जावे लागले. सुरुवातीला फॅमिली डॉक्टरांना दाखविण्यात आले. काही दिवसांपुरते बरे वाटल्याने किरकोळ औषधोपचार करून याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परंतु पुन्हा १५ दिवसांनंतर हीच घटना घडल्यानंतर पुढील तपासणीकरिता अकलूज येथे नेण्यातआले. येथील डॉक्टरांनी त्याला डायलेसीस करण्यासंबंधी सूचना दिल्या. त्याच्या शरीरात अचानक काही विशिष्ट अनावश्यक घटका वाढत असल्याने हळूहळू त्याचे परिणाम त्याच्या शरीरावर दिसून येत असल्याने चिंतातूर झालेल्या आई-वडिलांनी अविनाशच्या प्रकृतीत होत असलेल्या कॉम्प्लिकेशनमुळे तसेच त्याच्या आजाराचे निदान लागत नसल्याने त्याच्या प्रकृतीत अधिकच बिघाड होऊ लागल्याने त्याला मुंबईला नेण्याचा निर्णय घेतला.

मुंबईमध्ये अपोलो हॉस्पिटलमध्ये त्याच्या शरीराच्या संपूर्ण तपासण्या करण्यात आल्या आणि यामध्ये त्याच्या शरीरातील असणाºया दोन्ही किडन्यांमध्ये असलेला दोष दिसून आला. त्याच्या शरीरातील एक किडनी ६० टक्के काम करत होती तर दुसरी २० टक्के काम करत असल्याने त्याला नवीन शारीरिक व्याधींना तोंड द्यावे लागत होते. त्याच्या यातना तसेच त्याचे शरीरात सातत्याने होत असणाºया बदलामुळे सर्वांचीच मानसिकता खचत चालली होती.यावेळी किडनीची असलेली आवश्यकता लक्षात घेऊन त्यापद्धतीने किडनी देणाºया इच्छुकांची यादी पाहून त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला तर एका किडनीची किंमत २५ लाख रुपये सांगितली गेली. यावेळी देवकर कुटुंबाची परिस्थिती पाहता हा आकडा पाहून निश्चितच सर्वांना धक्का बसणे साहजिकच होते. याचवेळीअपोलो हॉस्पिटलमधील डॉ. रवींद्र निकाळजे तसेच डॉ. अमोल पाटील यांनी अविनाशसाठी त्याच्या आई किंवा वडिलांची जर किडनी देण्याचीइच्छा असेल तर किडनी ट्रान्सफर करण्यातकोणतीच अडचण येणार नसल्याचे सांगितले आणि हाताश झालेल्या देवकर कुटुंबीयांना आशेचा किरण पुन्हा दिसू लागला. पद्मिनी देवकर यांनी आपल्या मुलाला किडनी देऊन त्याला एक नवीन जीवन जगण्याचे बळ दिले.

अविनाशच्या यातना मी जवळून पाहिल्या आहेत. मुलाच्या जन्मानंतर जे समाधान आईला मिळते, त्याहीपेक्षा समाधान मला माझ्या मुलाला किडनी देताना झाले. त्याच्या सुखासाठी मी जे काही केले ते महान आहे, असे मला वाटत नाही; परंतु माझ्या किडनी देण्याने त्याचे आयुष्य सुखी व समाधानी झाले.-पद्मिनी देवकर.

 

टॅग्स :Navratriनवरात्रीSatara areaसातारा परिसर