प्रगती जाधव-पाटील ।कऱ्हाड : एकट्या वावरणाऱ्या युवतींसह चिमुरड्या मुलींबाबत वाढत असलेली असुरक्षितता लक्षात घेऊन पाहुण्यांबरोबरही सामान्य महिला आपल्या मुलीला एकटे पाठवू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे; पण प्र्रीतिसंगमावर तिशीतील एक महिला पाच वर्षांच्या चिमुरडीला बागेत भीक मागायला पाठवते. त्यानंतर ती निवांत वामकुक्षी घेते. दोन्ही मुठी पैशांनी भरल्या की दुडूदुडू धावत ही पावलं आईला उठवायला आणि पैसे दाखवायला पळतात.चिमुरडी आणून देतेय कष्टाची कमाई!संगमाशेजारी असणाऱ्या बागेत एक अत्यंत विदारक दृश्यही पाहायला मिळालं. अवघ्या चार ते पाच वर्षांची मुलगी मुक्तपणे या बागेत खेळत होती. थोड्या वेळाने खेळता खेळता तीही बागेतील लोकांकडून भीक मागू लागली. बोबड्या भाषेत भीक मागण्यामुळे काहींनी तिच्या हातावर चिल्लर तर काहींनी नोट टेकवली. बागेत ही मुलगी एकटीच आहे, असं वाटत असतानाच बागेच्या प्रारंभी असलेल्या पिण्याच्या पाण्याकडे ती गेली. तिथे तिची आई गवतावर वामकुक्षी घेत होती. हातात साठलेले सर्व पैसे देण्यासाठी तिने आईला उठविले. अत्यंत कष्टपूर्वक आई उठली ते पैसे तिच्याकडून घेतले. ‘खायला काही आणलेस का?’ विचारताच तिने केकचा तुकडा आणि भडंंगचा पुडा दाखवला. पैसे सुरक्षित ठिकाणी ठेवून तिने भडंगचे चार घास खाल्ले आणि पुन्हा त्या चिमुरडीला बागेतील दुसऱ्या टोकावर जाण्यास सांगितले. विशेष म्हणजे तिकडे कोणाकडे जायचे आणि कसे पैसे मागायचे याचं प्रशिक्षणच जणू ती देत होती. अवघ्या काही मिनिटांत या मुलीने चाळीस ते पंचेचाळीस रुपयांची कमाई करून आईकडे सुपूर्द केली होती.पोरगं-पोरगी रुसली की लई पैसं..!संगमावर कॉलेज आणि क्लासच्या नावाखाली फिरायला येणारी ही जोडपी प्रामुख्याने या टोळीच्या टार्गेटवर असतात. हातात असलेल्या मोजक्या वेळेत जोडीदाराशी गप्पा मारायच्या आणि या भिकाºयांकडे लक्ष द्यायचे अशी दुविधा जोडप्यांत असते. मनीषा म्हणते, ‘जोडप्याकडं हात पुढं केला की, पोरगी पाकिटातनं पैसं काढून देती. पोरं न्हायत देत, ती नुसती टिंगल करत्याती. एखाद्या जोडप्यात भांडण सुरू असलं तर आमी जात नाय; पण पोरगं पोरगी रुसली असत्याल तर जातो. तवा लई पैसं मिळतात.’संगमावर असलेल्या चिमुरड्यांची चांगलीच एकी आहे. या परिसरात फिरायला आलेल्या कोणीही त्यांना त्रास दिला किंवा काही गैरप्रकार केलाच तर बागेतील मुलं बाहेर येऊन त्याविषयी झाडाखाली बसलेल्या वयस्क महिलेला याची माहिती देतात. याच टोळीतील उंचीने लहान आणि कीर्तीने महान असलेला ‘मेहुणा’ त्यांचा कार्यक्रम काढायला जातो. बोलायला हजरजबाबी असलेला हा मेहुणा आक्रमक स्वभावाचा आहे.एका राऊंड लाशंभर रुपये ठरलेले..!संगमावर सकाळी चार-पाच वाजल्यापासूनच फिरायला येणाºयांची गर्दी सुरू होते. सकाळी आठनंतर येथे शाळा कॉलेजमधील मुलांचा वावर वाढायला सुरुवात होते. त्यामुळे येथे सकाळी नऊ वाजता वयस्क महिलेची मुलांसह हजेरी लागते. त्यानंतर दोन तासांच्या फरकाने संध्याकाळी सातपर्यंत भीक मागितली जाते. प्रत्येक राऊंडला सरासरी शंभर रुपयांची कमाई केल्याशिवाय ही मुलं बाहेर पडतच नाहीत, हे विशेष!
आई झोपतेय अन् लेक भीक मागते..! भीक मागण्याचे स्पॉट ठरवून माता निश्चिंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 11:02 PM
कऱ्हाड : एकट्या वावरणाऱ्या युवतींसह चिमुरड्या मुलींबाबत वाढत असलेली असुरक्षितता लक्षात घेऊन पाहुण्यांबरोबरही सामान्य महिला आपल्या मुलीला एकटे पाठवू शकत नाही,
ठळक मुद्देदिवसाची कमाई शंभर