म्हसवड : माय-बापाच्या आशिर्वादात जे सामर्थ्य आहे ते देवाच्या आशिर्वादात नाही आणि मायबापाच्या शापात जी ताकद आहे ती तपस्वीत नाही. जगाच्या पाठीवर श्रेष्ठतत्व आई-बापाच्या सेवेत आहे. म्हणून सर्वश्रेष्ठ आई. आई शिवाय कोणी मोठे नाही. आई जाणं म्हणजे सर्वात मोठे नुकसान असे प्रतिपादन ह. भ. प. रामरावजी ढोक यांनी केले.आमदार जयकुमार गोरे यांच्या मतोश्री दिवंगत कमलताई भगवानराव गोरे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त बोराटवाडी, ता. माण आयोजित कार्यक्रमात किर्तन सादर करताना बोलत होते. यावेळी आमदार जयकुमार गोरे, अंकुश गोरे, भारती गोरे, सोनिया गोरे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, सभापती आक्काताई मासाळ, उपसभापती अतुल जाधव, तहसीलदार महेश पाटील, गटविकास अधिकारी सीमा जगताप, मुख्याधिकारी पल्लवी मोरे, पाटील, सुरेश जाधव, संजय भोसले, विजय कणसे, एम. के. भोसले, विजय सिन्हा, नितीन दोशी, विजय धट, सुरेश म्हेत्रे, वसंत मासाळ यांच्यासह माण-खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा या तालुक्यातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.ढोक महाराज म्हणाले की आपल्यातुन निघू गेलेल्या पुण्यात्मांची आठवण काढणे म्हणजे पुण्यस्मरण, जिच्या पोटी शूर जन्माला आला, भक्त जन्माला आला, दाता जन्माला आला तिला माता म्हणतात. आमदार जयकुमारजी तुम्ही मोठे व्हा, तुम्हाला लाल दिवा मिळु द्या. मोठं मोठ्याचा हात तुमच्या पाठीवरुन फिरु द्या पण आईने तुम्हाला दिलेल्या शाबासकीत जे प्रेम होते ते कोणाच्याही शाबासकीत नाहीत. मायबापाच्या आशीर्वादात जे सामर्थ्य आहे त देवाच्या आशीर्वादात नाही.दुपारी १२. ३० वाजता दिवंगत कमलाताई गोरे यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली.(प्रतिनिधी)
जगाच्या पाठीवर आई-वडील सर्वश्रेष्ठ
By admin | Published: February 03, 2015 9:19 PM