मायणी : चितळी तालुका खटाव येथे दीक्षा रामराव उबाळे ( वय १४ ) मूळ राहणार इटलापूर ता.जि.परभणी या बालिकेचा रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास विहिरीत पडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली या घटनेमुळे मोलमजुरी करणाऱ्या या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
याबाबत मायणी पोलीस दूरक्षेत्रातून मिळालेली अधिक माहिती इटलापूर ता.जि.परभणी येथून मोलमजुरी करण्यासाठी रामराव मुरलीधर उबाळे हे पत्नी व तीन मुलांसह गत दोन वर्षांपूर्वी चितळी तालुका खटाव येथील यशवर्धन पवार फार्म हाऊस आली आहे .
रविवारी दुपारी दोनच्या दरम्यान फॉर्मस हाऊस जवळच काम करत असलेल्या आई वडिलांना भेटून ही मुलगी माघारी घराकडे आली घरापर्यंत पोहोचलीच नाही.त्यानंतर मुलीचा शोध घेतल्यानंतर या मुलीचा मृतदेह फॉर्म हाऊस जवळ असलेल्या विहिरी मध्ये आढळून आला. फॉर्मस हाऊस , कुटुंबाची वस्ती व विहीर या सर्वांमध्ये १०० ते २०० फुटाची फक्त आंतर आहे.दीक्षा इयत्ता सातवी मध्ये शिक्षण घेत होती. नेमका या दीक्षा चा मृत्यू कशामुळे झाला हे मात्र कोणालाही सांगता येत नाही.
या घटनेची नोंद रविवारी सायंकाळी मायणी पोलीस सुरू केल्यानंतर या मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कलेढोण येथील कुटीर रुग्णालयात पाठवण्यात आला रात्री उशिरा या मुलीचा मृतदेह आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आला .मुलगी दीक्षा चा मृतदेह ताब्यात मिळाल्यानंतर या उबाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सदर घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल विकास जाधव करत आहेत.