"हरयाणासारखं महाराष्ट्रात घडणार नाही, कारण शरद पवार..." अमोल कोल्हेंनी महायुतीला डिवचलं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 05:48 PM2024-10-14T17:48:17+5:302024-10-14T17:50:33+5:30
Amol Kolhe : आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात फलटणचे संजीवराजे नाईक निंबाळकर आणि आमदार दीपक चव्हाण प्रवेश करणार आहे.
Amol kohlhe ( Marathi News ) : "हरयाणा विधानसभेचा निकाल काँग्रेसच्या हाता तोंडाशी आलेला निकाल गेला आणि महाराष्ट्रातील अनेकांना स्वप्न पडू लागली, म्हणून वर्तमानपत्रात जाहीराती येऊ लागल्या. या जाहीरातींमुळे महाराष्ट्रात हरयाणासारख काही घडलं तर असे प्रश्न पडू लागले. मी त्यांना सांगितलं हरयाणा सारख महाराष्ट्रात घडू शकत नाही कारण शरद पवार इथे उभे आहेत, असं विधान करत खासदार अमोल कोल्हे यांनी महायुती सरकारला डिलचलं.
"राज ठाकरे आणि मी एकत्र आलो तर..."; स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजेंचं मोठं विधान
राज्यात येणाऱ्या दोन दिवसात विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे. या पार्श्वभूमीवर पक्षांनी मोठी तयारी केली आहे. आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील फलटणचे संजीवराजे नाईक निंबाळकर आणि आमदार दीपक चव्हाण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमासाठी खासदार शरद पवार, खासदार अमोल कोल्हे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित आहेत. यावेळी बोलताना अमोल कोल्हे यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली.
खासदार अमोल कोल्हे म्हणाले, आज संपूर्ण महाराष्ट्राने हा निकाल हाती घेतला आहे. गेल्या वर्षी दिल्लीतीन भाजपाच्या नेत्यांनी अनेकांना जबरदस्ती निर्णय घ्यायला सांगितले. अनेकांनी मनाविरुद्ध निर्णय घेतले. पण आता आज होणारा निर्णय सर्वांच्या मनातून होतोय, असंही अमोल कोल्हे म्हणाले.
"गुजरातचे काही नेते दिल्लीत बसले आहेत, ते नेत्यांना भिती घालतात आणि निर्णय बदलायला लावतात. गेली दोन अडीच वर्षी महाराष्ट्रात चुकीच्या पद्धतीने राजकारण सुरू आहेत. गेल्या अडीच वर्षात मंत्री, नेते विकत घेता येतात हे दिल्लीकरांनी दाखवले पण महाराष्ट्र कधीही झुकणार नाही हे आपल्याला दाखवायचं आहे, असंही कोल्हे म्हणाले.
"सत्तेची दिवाळी करण्यासाठी हे सरकार तिजोरीची दिवाळी करायला चालले, त्या सरकारला घरी पाठवल्याशिवाय थांबायचं नाही. लोकसभेत मतांची कडकी झाल्यामुळे आता बहीण लाडकी झाली आहे, असा टोलाही कोल्हे यांनी लगावला.