शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
3
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
4
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
5
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
6
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
7
"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
8
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट
9
नवरी जोमात, नवरा कोमात! घरातून पळाली; बॉयफ्रेंडशी केलेल्या लग्नाचे पाठवले फोटो, पती म्हणतो...
10
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
11
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
12
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
13
डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज
14
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
15
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
16
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
17
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
18
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
19
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
20
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात

हृदयद्रावक! आई-वडिलांचा आधार हरपला; सातारच्या २६ वर्षीय जवानाला 'वीरमरण'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 12:52 PM

vijay kokare martyred : सातारा जिल्ह्यातील आणखी एक जवान शहीद झाला आहे.

vijay kokare indian army | सातारा :  सातारा जिल्हा हा जवानांचा जिल्हा म्हणून देखील ओळखला जातो. आपल्या भारतमातेच्या सेवेसाठी या जिल्ह्याने अनेक शूरवीर सीमेवर पाठवले आहेत. तर अनेकांना देशासाठी लढताना वीरमरण देखील आलं आहे. आता आणखी एक सातारचा जवान तिरंग्याची सेवा करत असताना शहीद झाला आहे. सातारा तालुक्याच्या परळी येथील सांडवली वारसवाडी भागातील जवान विजय रामचंद्र कोकरे यांना जम्मू काश्मीर येथे कर्तव्य बजावताना वीरमरण आलं. २६ वर्षीय जवानाला हुतात्म आल्याने जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. 

सातारा शहरासह सांडवली परिसरात त्यांच्या श्रद्धांजलीचे बॅनर लावण्यात आले आहेत. मागील चार वर्षे सैन्यदलात कार्यरत असणाऱ्या विजय यांची प्राणज्योत मालवली अन् एकच शोककळा पसरली. राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून वीर जवानास  श्रद्धांजली वाहिली. 

२६ वर्षीय जवानाला 'वीरमरण'जवान विजय कोकरे हे शहीद झाल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांना आर्मी सेंटरकडून देण्यात आली. पण, पार्थिव मूळ गावी कधीपर्यंत आणले जाईल याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. खरं तर विजय कोकरे यांचे शिक्षण मुंबईत झाले असून त्यांचे आई-वडील देखील मुंबईत राहतात. वाहनचालकाच्या मुलाचे लहानपणापासून स्वप्न होते की, भविष्यात सैन्यदलात भर्ती होऊन देशाची सेवा करावी. विजय यांच्या पश्चात आई-वडील आणि बहीण असा परिवार आहे. 

उदयनराजेंनी वाहिली श्रद्धांजलीखासदार उदयनराजे भोसले यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले असून वीर जवानाला श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी म्हटले, "सैनिकी परंपरा असलेल्या आपल्या सातारा जिल्ह्यातील परळी भागातील सांडवली वारसवाडी येथील जवान विजय कोकरे हे जम्मू काश्मीर या ठिकाणी देशसेवेत कार्यरत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. शालेय जीवनापासून देशसेवेत जाण्याची त्यांची जिद्द होती. २०१७ मध्ये मोठ्या कष्टाने ते स्वप्न विजय यांनी पूर्ण केले. जवान विजय यांच्यावर अतिशय लहान वयात (२६) झालेला हा आघात सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो भावपूर्ण श्रद्धांजली."

टॅग्स :satara-acसाताराIndian Armyभारतीय जवानMartyrशहीदUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसले