शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याकडून कोट्यवधीची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2022 1:38 PM

फलटण : ‘खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी स्वराज साखर कारखाना व स्वराज नागरी सहकारी पतसंस्था यांच्या माध्यमातून आपली कोट्यवधी रुपयांची ...

फलटण : ‘खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी स्वराज साखर कारखाना व स्वराज नागरी सहकारी पतसंस्था यांच्या माध्यमातून आपली कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे,’ असा गंभीर आरोप दिगंबर आगवणे यांनी केला आहे. त्यांनी याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे.दिगंबर आगवणे यांनी अर्जात म्हटले आहे की, व्यवसायाच्या माध्यमातून २००७ मध्ये रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याशी संपर्क आला. त्यांच्या सुरवडी येथील तत्कालीन स्वराज दूध डेअरीसाठी लाकूड पुरवठा करीत होतो. तेव्हापासून आर्थिक व्यवहार होते. त्यानंतर रणजितसिंह यांनी त्यांच्या उपळवे येथील स्वराज कारखान्याचे व्हाईस चेअरमनपदाचे आमिष दाखवून आर्थिक मदतीची विनंती केली.आपण २०१४ मध्ये पिंपळवाडी येथील सर्व्हे नं. ६४/४, क्षेत्र १.६२ हेक्टर ही जमीन सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या पुणे कॅम्प शाखाकडून ५० कोटी, बँक ऑफ इंडियाच्या पुणे शाखेतून ४७.१३ कोटी आणि कॅनरा बँककडून ४५ कोटी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या साखर कारखान्यास कर्ज मिळण्याकरिता गहाण ठेवली. ऑक्टोबर २०१४ मध्ये नमूद कारखान्याचे व्हाईस चेअरमनपदावर आपली नियुक्ती केल्याचे पत्र देण्यात आले.डिस्टिलरी प्रोजेक्टसाठी पुन्हा ही जमीन सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या पुणे कॅम्प शाखेत गहाण ठेवून ८४ कोटी कर्ज असे २२६ कोटी रुपये कर्ज साखर कारखान्याच्या चेअरमन रणजितसिंह निंबाळकर आणि संचालक मंडळाने तिन्ही बँकेच्या संमतीने काढले आहे.रणजितसिंह हे चेअरमन असलेल्या स्वराज पतसंस्थेतून २०१३ मध्ये त्यांच्या पत्नी जिजामाला यांना पंचायत समितीची निवडणूक लढवायची असल्याने आपल्या नावे कर्ज घेतले. पुढे २०१६-२०१७ मध्ये त्यांनी याच पतसंस्थेमध्ये आपली सुरवडी येथील शेत सर्व्हे नं. ४८/२ ह्या जमिनीचा वाद सुरू असल्यामुळे त्यांच्यावर वहिवाट व बोजा दिसण्यासाठी केस चालू असताना रणजितसिंह यांनी ही जमीन गहाण ठेवून एक कोटी रुपये कर्ज घेतले होते.परंतु कर्ज प्रकरणात आपल्या सह्या घेऊन संबंधित रक्कम आपल्याला मिळालेली नाही. त्यांपैकी परस्पर ५९ लाख रुपये कर्ज पतसंस्थेमध्ये कारखान्याने भरल्याचे आपल्याला समजले आहे. या कर्ज प्रकरणात आपल्या सह्या असल्याने रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी या पतसंस्थेद्वारे कलम १३८ एन. आय. ॲक्टप्रमाणे न्यायालयात दावा दाखला केला आहे, असे दिगंबर आगवणे यांनी तक्रारीत म्हटले आहे.या प्रकरणांवरून खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, स्वराज इंडिया ॲग्रो लिमिटेड या साखर कारखान्याचे सर्व संचालक आणि स्वराज नागरी पतसंस्थेचे सर्व संचालक यांच्याविरोधात विश्वासघात, खोटी कागदपत्रे तयार करणे आणि फसवणुकीबाबत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पोलिसांकडे तक्रार अर्जाद्वारे केली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीRanjitshinh Naik-Nimbalkarरणजितसिंह नाईक-निंबाळकर