शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बदल्याचे नाही, बदलाचे राजकारण करणार’; पाच वर्षे राज्याला गतिमान बनविणार ‘दुष्काळमुक्त महाराष्ट्र’ हे असेल मिशन
2
राशीभविष्य - ५ डिसेंबर २०२४: 'या' लोकांना आर्थिक लाभ संभवतात, नशिबाची साथ लाभेल
3
मुख्यमंत्री फडणवीसच, आज मुंबईत पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत भव्य शपथविधी सोहळा
4
भूकंप तेलंगणात, हादरा विदर्भात! भूकंपाची तीव्रता ही ५.३ रिश्टर स्केल
5
मेडिकल परीक्षेलाही पेपरफुटीची बाधा, खबरदारी म्हणून ऐन वेळी बदलला फार्माकॉलॉजी-२ चा पेपर
6
वह समंदर है, लौटकर आया है... आझाद मैदानावर आज आवाज घुमेल... मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस.... शपथ घेतो की...
7
राज्यात पुन्हा देवेंद्र... बूथप्रमुख’ ते ‘महाराष्ट्राचा मुख्यमंत्री’ आणि आता ‘पुन्हा मुख्यमंत्री’ असा देवेंद्र यांचा विलक्षण प्रवास राहिला
8
लाडक्या बहिणीला मदत मिळाली, आता हवे ‘सक्षमीकरण’
9
प्रियांका गांधी यांनी घेतली गृहमंत्री अमित शाह यांची भेट, काय होतं कारण? काय केली मागणी?
10
हिंदूंवर हल्ले झालेच नाही; बांग्लादेश सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या उलट्या बोंबा
11
BRI Project : चीनसोबत करार करून खूश झालेल्या ओलींना दिसेना धोका, भारताचंही टेन्शन वाढवलं!
12
IND vs AUS: रोहित शर्माने दुसऱ्या टेस्टमध्ये किती नंबरला बॅटिंग करावी? रवी शास्त्रींनी दिला विशेष सल्ला, म्हणाले...
13
Video: पुलवामात दहशतवादी हल्ला; सुट्टीवर घरी आलेल्या जवानावर झाडल्या गोळ्या
14
तिसरं महायुद्ध होऊनच राहणार...? बाबा वेंगांच्या 'या' भविष्यवाणीत विनाशाचा संदेश; सांगितलं, केव्हा होणार महायुद्ध?
15
IND vs AUS: सर डॉन ब्रॅडमन यांच्या 'बॅगी ग्रीन' टोपीचा लिलाव, मिळाली मोठी किंमत! आकडा ऐकून थक्क व्हाल
16
“मराठ्यांसमोर कोणतीही सत्ता, मस्ती टिकत नाही, १००% उपोषण होणार, आझाद मैदानात...”: मनोज जरांगे
17
“महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी देवेंद्र फडणवीस एक शिवभक्त म्हणून काम करतील”: सुधीर मुनगंटीवार
18
राजकीय घडामोडींना वेग, एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस यांच्यात वर्षा बंगल्यावर खलबतं
19
"भारत, तुम्हारी मौत...!; 20 वर्षांनंतर दहशतवादी अझहरचं भाषण, पंतप्रधान मोदी अन् नेतन्याहू यांच्याबद्दल ओकली गरळ
20
Maharashtra Election:- शपथविधीला ५ तारीखच का निवडली? धर्मशास्त्रांत अत्यंत महत्त्वाचा योग; ५ वर्षे सरकार अढळ राहणार?

'शिवेंद्रराजेंना मंत्री करा' म्हणत टॉवरवर आंदोलन; उदयनराजेंनी त्या होमगार्डला फोन केला, अन्..

By दीपक शिंदे | Published: December 04, 2024 6:23 PM

उदयनराजे भोसले यांचे आवाहन : होमगार्डने दिला होता आत्महत्येचा इशारा

सातारा : छत्रपती घराण्याचा मान राखा, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा कॅबिनेट मंत्रिमंडळात समावेश करून चांगले पद द्यावे, अशी मागणी करत जालना जिल्ह्यातील सदाशिव ढाकणे या कर्मचाऱ्याने बुधवारी ‘मोबाइल टॉवर’वर चढून आत्महत्येचा इशारा दिला. याची माहिती मिळताच खुद्द खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यास फोन करून समजूत काढली. तो टॉवरवरून उतरत नसल्याने उदयनराजे यांनी माझी शपथ आहे, जिवाचं बरं-वाईट करू नको, असे सांगितल्यानंतर ढाकणे खाली उतरला.राजूर-टेंभुर्णी रोडवर असलेल्या एका मोबाइल टॉवरवर बुधवारी सकाळी सदाशिव ढाकणे हा चढला. त्याने महायुतीच्या नेत्यांना चार तासांची मुदत देऊन मंत्रिमंडळात कॅबिनेटपदी शिवेंद्रराजे यांना घ्यावे, अशी मागणी केली. छत्रपती घराण्याचा मान देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार आदी नेत्यांनी राखावा, असे आवाहन करत मोबाइल टॉवरवरून खाली उडी टाकण्याचा इशारा दिला.याची माहिती कळताच खासदार उदयनराजे भोसले यांनी त्या युवकाचा नंबर मिळवून त्यास फोन केला. त्याची चौकशी करून तुमचं आयुष्य एवढं स्वस्त नाही. तुमच्या भावना कळल्या आहेत. तुम्ही खाली उतरा. मेहरबानी करा, पण डोक्यात असे विचार आणू नका. तुमच्या कुटुंबीयांनी कोणाकडे बघून जगायचं. माझी शपथ आहे, छत्रपती शिवरायांची शपथ देतो. खाली उतरा, असे आवाहन केल्यानंतर तो युवक खाली उतरला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरJalanaजालनाUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसलेministerमंत्रीagitationआंदोलन