फलटण : साखरवाडी येथील श्री दत्त इंडिया लि., साखरवाडी (ता. फलटण) कारखान्याचा वजन-काटा अचूक असल्याचा अहवाल वैधमापनच्या भरारी पथकाने दिला. प्रादेशिक सहसंचालक (साखर) पुणे विभाग तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी व उपविभागीय अधिकारी फलटण यांच्या आदेशानुसार वैधमापन खात्याच्या भरारी पथकाने अचानक भेट देऊन कारखान्यातील वजन-काट्याची तपासणी केली.
तहसीलदार समीर यादव, विशेष लेखापरीक्षक ए. एस. शिरतोडे, पोलीस उपनिरीक्षक (ग्रामीण) एस. एन. जाधव, पुरवठा निरीक्षक मनोज काकड, आ. पी. आखरे, गोपाळ सरक, दत्तात्रय शिपुकुले यांचा भरारी पथकात समावेश होता. या पथकाने अंगदगाडी, ट्रक यांचे फेरवजन घेऊन तपासणी केली, यात वजन-काटा अचूक असल्याचे दिसून आले.
पथकाने कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी अजित जगताप व मुख्य शेती अधिकारी सदानंद पाटील यांच्याकडे काटा बिनचूक असल्याचा अहवाल दिला. यावेळी राजेंद्र भोसले, ऊस पुरवठा अधिकारी दिगंबर माने, पोपट भोसले, संतोष भोसले, नितीन भोसले, जयवंत इंगळे आदी उपस्थित होते.