शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

Satara: वाईतील तरुण लघुकाव्यातून उलगडतोय ऐतिहासिक शस्त्रास्त्रांचा इतिहास!

By सचिन काकडे | Published: April 08, 2024 3:14 PM

या अनोखा उपक्रमामुळे शस्त्रांचा इतिहास घराघरात पोहोचू लागला

सचिन काकडेसातारा : तलवार, दांडपट्टा, वाघनघं, भाला, कट्यार अशा शस्त्रांनी लढाईत मोलाची भूमिका बजावली आहे. या ऐतिहासिक शस्त्रांचा वापर कालौघात बंद झाला असला तरी त्यांचे महत्त्व तसूभरही कमी झालेले नाही. वाई येथे राहणाऱ्या मृण्मय दीपक अरबुणे (वय २६) या तरुणाने याच शस्त्रांचा इतिहास लघुकाव्य रूपात मांडण्याचा छंद लीलया जोपासला असून, त्याच्या या अनोखा उपक्रमामुळे शस्त्रांचा इतिहास घराघरात पोहोचू लागला आहे.

भारतीय इतिहास अभ्यास क्षेत्रात शस्त्रास्त्रांचा स्वतंत्र पद्धतीने अभ्यास करण्याची कोणतीही शाखा उपलब्ध नाही. त्याचमुळे मृण्मयला शस्त्रांचा अभ्यास करताना अनेक अडचणी आल्या. परंतु, या अडचणींवर मात करून त्याने शस्त्रांसंबंधी संदर्भ साहित्य मिळवून अभ्यास करण्यास सुरुवात केली. कोरोनो संक्रमण काळात मृण्मयला कोरोनाची लागन झाली. पुणे येथील एका रुग्णालयात तो उपचार घेत होता. या मोकळ्या वेळेत त्याने शस्त्रांचा इतिहास लघुकाव्यातून मांडण्याचा प्रयत्न सुरू केला.शस्त्र आणि त्याची काव्यात्मक माहिती त्याने सोशल मीडियावर पोस्ट केली. या पोस्टला उत्तम प्रतिसाद मिळू लागल्याने त्याने आपली काव्यरचना रचना पुढे सुरू ठेवली. गेली अडीच-तीन वर्षांत मृण्ययने ५०० हून अधिक ऐतिहासिक शस्त्रांचा काव्यरूपातून उलगडा केला आहे.

‘चंद्रहास’ नावाने काव्यरचनामृण्यम याने इतिहास या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली असून, सध्या तो पुणे विद्यापीठातून इतिहास विषयात पीएचडीचे शिक्षण घेत आहे. शस्त्रास्त्रांवर लिखाण करत असताना त्या लिखाणाला सजेसं टोपण नाव असावं, अशी मृण्मयची इच्छा होती. त्यासाठी त्याने ‘चंद्रहास’ हे टोपण नाव निवडले. हे नाव निवडण्यामागे कारण असे की, शिवशंकराने रावणाला दिलेल्या तलवारीचे नाव चंद्रहास होते. ही तलवार शिवाशी निगडित आहे. तसेच, ते तलवारीचे नाव आहे आणि मृण्मय शस्त्रास्त्रांवर लिखाण करतो म्हणून त्याने ‘चंद्रहास’ या नावाने काव्यरचना सुरू केल्या.

शस्त्रास्त्र या विषयावर सखोल संशोधन करून भारतीय इतिहासाच्या अभ्यास शाखांमध्ये शस्त्रास्त्रांचा अभ्यास करणारी शस्त्रास्त्र शास्त्र अशी एक अभ्यास शाखा निर्माण करण्याचा माझा मानस आहे. सध्या याच अनुषंगाने प्राचीन भारतीय शस्त्रास्त्रांवर माझी पीएचडी सुरू आहे. भविष्यात याच क्षेत्रामध्ये संशोधनात्मक कार्य करण्याची इच्छा आहे. ऐतिहासिक माहितीसाठी सतत नवनवीन ऐतिहासिक संदर्भ जमवतो; वाचतो त्याचबरोबर अलंकारिक लिखाण करण्यासाठी आणि शब्द सामर्थ्यासाठी कादंबऱ्या, काव्यसंग्रहदेखील वाचतो. - मृण्मय अरबुणे

टॅग्स :Satara areaसातारा परिसर