शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

महावितरणने उचलला ४१ विद्यार्थ्यांचा प्रवास खर्च

By admin | Published: January 29, 2016 10:53 PM

अधिकाऱ्यांची सामाजिक बांधिलकी : तीन महिन्यांचा भार उचलून पाल्यांना दिला दिलासा - गुड न्यूज

सातारा : दुष्काळी भागातील गरीब शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण पैशाअभावी थांबू नये म्हणून ‘महावितरण’ने हातभार लावला आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी एकत्र येत ४१ विद्यार्थ्यांचा तीन महिन्यांच्या एसटी पासेसचा खर्च उचलला आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते या पासेसचे वितरण केले.‘जनतेसाठी विद्युतशक्ती’ हे ब्रीद घेऊन महावितरणचे अधिकारी, कर्मचारी नागरिकांना प्रकाश देण्यासाठी २४ तास कर्तव्यतत्पर असतातच. आता दुष्काळी विद्यार्थ्यांना मोफत पास देऊन त्यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीचेही दर्शन घडविले आहे. सातारा जिल्ह्यातील दुष्काळी गावांतील काही गरीब शेतकऱ्यांच्या पाल्यांनी एसटी पाससाठी पैसे नसल्याने शिक्षण सोडल्याचे सामाजिक कार्यकर्ते धर्मराव जगदाळे यांच्या निदर्शनास आले. जगदाळे यांनी या विद्यार्थ्यांना पास वाटण्याचा प्रस्ताव महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोर मांडला. अधीक्षक अभियंता सुरेश गणेशकर यांनी तातडीने त्यास होकार दिला. गणेशकर यांच्यासह कार्यकारी अभियंता सुनील शिंदे, अरविंद यादव, अनिल बडवे, विश्वास देशमुख, सतीश राजदीप, प्रभारी कार्यकारी अभियंता अजित नवाळे, व्यवस्थापक वैभव थोरात यांनी पुढाकार घेऊन पाचवी ते दहावीत शिकणाऱ्या ४१ गरीब विद्यार्थ्यांना जानेवारी ते मार्च २०१६ या त्रैमासिक पासचे वितरण करण्याचे निश्चित केले. खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते सातारा क्लब हाउसमध्ये नुकतेच या पासेसचे वितरण करण्यात आले. महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या या मदतीमुळे गरीब विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)अनोखा झटका..ऐन परीक्षेच्या काळात विद्युत भारनियमन होत असल्याने विद्यार्थ्यांमधून वारंवार तक्रारी येत असतात. तर कृषिपंपासाठी पुरेशी वीज मिळत नाही, अशी ओरड शेतकऱ्यांमधून होत असते. वीजवितरण कंपनी सतत या ना त्या कारणाने झटका देत असतानाच सातारा जिल्ह्यात अनोखा झटका अनुभवयास मिळाला. ४१ विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा खर्च उचलल्याने समाधान व्यक्त होत आहे.