घेण्यास दिवसाचा उशीर, हजाराचा फटका !
स्टार ९५३
सागर गुजर
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : विजेच्या मीटरचे रिडींग एक दिवस उशिरा घेतले तरी ग्राहकांना साधारण हजार रुपयांचा फटका बसतो. महावितरणकडून अनेकदा उशिरा रिडींग घेतले जाते. त्यामुळे विजेचा दर दुप्पट होतो आणि त्याचा फटका ग्राहकांना बसतो. ग्राहकांना या जाचातून मुक्तता हवी आहे.
साताऱ्यातील अनेक ग्राहकांना वीजबिलांच्या जादा आकाराचा फटका बसतो आहे. जादा बिल आल्याने ग्राहकही ते भरण्यास टाळाटाळ करत असल्याने वीज विभागाची थकबाकीही वाढते. मीटर रिडींग उशिरा घेतले जात असल्याने ग्राहकांचे नुकसान होत आहे. रिडींग घेणारे कर्मचारी हे केव्हाही वेळ मिळेल तेव्हा जर रिडींग घ्यायला येत असतील तर जादा बिल भरावे लागते. १०० युनिटपर्यंत वीज वापर केला तर ३.४६ रुपये दराने वीजबिल भरावे लागते. हेच बिल जर १०० युनिटच्यावर १ रुपया जरी गेले तरी ७.४३ रुपये दराने वीजबिल आकारले जाते. त्यामुळे मीटर रिडींग घेणाऱ्या कर्मचाऱ्याने ते वेळेत घेणे गरजेचे आहे.
या बातमीत खालील मुद्दे अपेक्षित आहेत.
१) महावितरणचे ग्राहक
घरगुती - ७०१५३०
कृषी - १८६८१९
औद्योगिक - १०३०१
१०० युनिट
२) १०० युनिटपर्यंत ३.४६ रुपये प्रति युनिट दराने वीजबिलाची आकारणी केली जाते. ग्राहकांनी मर्यादित वीज वापरली तर १०० युनिटपर्यंत कमी आकाराचा फायदा ग्राहकांना मिळतो.
१०१पासून ३०० युनिट
वीज ग्राहकांनी जर ३०० युनिटपर्यंत विजेचा वापर केला तर दुप्पट आकाराने वीजबिल भरावे लागते. १०१ ते ३०० युनिटपर्यंत ७.४३ रुपये दराने वीज आकारणी केली जाते. त्यामुळे ग्राहकांनी जर विजेची बचत केली तर त्यांना आर्थिक फायदा होताे.
रिडींग घेण्यासाठी मिळावा ज्यादा वेळ
मीटर रिडींग घेण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना अवघा चार दिवसांचा वेळ मिळतो. एवढ्या कमी कालावधीमध्ये त्यांना मोठ्या संख्येने लोकांपर्यंत पोहोचावे लागते. अनेकदा एखादं दुसरे घर राहिले तर ज्यादा आकाराचे बिल घेतले जाते.
३) ही घ्या उदाहरणे (रिडींग उशिरा घेतल्यामुळे बिल वाढलेल्या दोन ग्राहकांची उदाहरणे. चार चार ओळींचे दोन बॉक्स)
अ) पवन देशपांडे यांना १०० युनिटच्या पुढचे बिल मिळाले. वास्तविक त्यांनी नेहमीप्रमाणे कमी वीज वापर केला होता. मात्र, त्यांना आलेले बिल हे ११० युनिटचे होते. रिडींग उशिरा घेतल्याने देशपांडे यांना १० युनिटचा भुर्दंड बसला.
ब) समीर काळे यांना जेव्हा हाती बिल मिळाले, तेव्हा त्या बिलाची मुदत संपून गेलेली होती. या बिलापोटी त्यांना ९५० रुपये भरायचे होते. तर लेट चार्जेस म्हणून १० रुपयांचा भुर्दंड त्यांना सोसावा लागला आहे.
४) अभियंत्याचा कोट
ग्राहकांच्या सोयीसाठी आणि फायद्यासाठी वीज विभागाने नवीन योजना राबविली आहे. ग्राहकांनीच आपल्या मीटरवरील रिडींगचे फोटो वीज विभागाच्या मेलवर पाठवायचे आहेत. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच वीज बचत करण्यातदेखील ग्राहकांना यश आले आहे.