शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

मुदगल यांनी राज्याचे मुख्य सचिव व्हावे

By admin | Published: April 24, 2017 10:04 PM

कामकाजाचे कौतुक : जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून जिल्हाधिकाऱ्यांना निरोप

सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हा नियोजन समितीची सोमवारी बैठक झाली. बैठकीच्या सुरुवातीस आमदार शिंदे यांनी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांचा अभिनंदनाचा ठराव मांडला. त्याला आमदार शंभूराज देसाई यांनी अनुमोदन दिले. यावेळी पालकमंत्री विजय शिवतारे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांबद्दल गौरवोद्गार काढत जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्य सचिव व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनीही सर्वांचे आभार मानत ॠणानुबंध कायम राहतील, अशी ग्वाही दिली. त्यानंतर समितीच्या कामकाजास सुरुवात झाली. जिल्हाधिकारी मुदगल यांनी प्रास्ताविक केल्यानंतर आमदार शिंदे यांनी पाणी योजनांचा मुद्दा उपस्थित केला. राष्ट्रीय पेयजल योजनेचे अनुदान बंद झाले आहे. मुख्यमंत्री पेयजल योजनेतून जिल्ह्यात एकही योजना झाली नाही. जिल्हा नियोजन समितीतूनही निधीची तरतूद केली नाही त्यामुळे गेल्या अडीच वर्षांपासून एकही नवीन पेयजल योजना झालेली नाही. आजपर्यंत किती प्रस्ताव प्रलंबित आहेत. किती पाठवले, किती मंजूर झाले आणि मागणी कधी होती याची सविस्तर यादी प्रशासनाने द्यावी, अशी मागणी केली. आमदार शंभूराज देसाई यांनीसुद्धा जिल्हा नियोजन समितीतून निधी राखीव ठेवून ५० टक्के निधी नवीन योजनांना तर ५० टक्के निधी अपूर्ण योजनांना देण्यात यावा, अशी मागणी केली. गेल्या अडीच वर्षांत एकही नवीन योजना शासन करू शकलेले नाही. आमदार मकरंद पाटील यांनी राष्ट्रीय पेयजलच्या काही योजना अर्धवट आहेत. असलेल्या योजनांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळत नाही. आमदार शिंदे यांनी याबाबत जिल्हा नियोजनमध्ये ठराव करू, अशी भूमिका मांडली. आ. जयकुमार गोरे यांनी ‘जलयुक्त’ कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केले. तसेच १५८ रुपयांची कामे झाली आहेत त्याची सविस्तर माहिती देण्यात यावी, अशी मागणी केली. जिल्हाधिकारी मुदगल यांनी जलयुक्तच्या गुणवत्तेबाबतचे प्रश्न खोडून काढत गुणवत्ता तपासल्यानंतर बिले काढण्यात आल्याचे सांगितले. आमदार आनंदराव पाटील यांनी हनुमान संस्थेच्या उपोषणाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर जिल्हा उपनिबंधक अनुपस्थित असल्याचे पालकमंत्री शिवतारे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संताप व्यक्त केला. यापुढे असे पुन्हा चालणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना नोटीस द्यावी. बैठकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही मुद्दे मांडले त्यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. (प्रतिनिधी)शंभूराज देसार्इंच्यावर पालकमंत्र्यांची स्तुतिसुमनेआपल्याला बढती मिळून पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरू आहेत, हे खरे आहे का?, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर ‘शिवसेनेत पक्षप्रमुखांचा आदेश महत्त्वाचा असतो. मला अचानकपणे मंत्रिपद दिले गेले आहे. शंभूराज देसाई यांची काम करण्याची पद्धत अत्यंत अभ्यासपूर्ण आहे. साताऱ्यातील सर्वच आमदार अभ्यासू आहेत. शंभूराज मात्र विविध योजनांची माहिती घेऊन त्या योजनांचा निधी आपल्या मतदार संघात आणण्यासाठी कायमच तत्पर असतात, त्यांना मंत्रिपद मिळाले तर ते आणखी जोमाने काम करतील,’ अशी स्तुतिसुमने पालकमंत्री विजय शिवतारे यांनी आ. देसाई यांच्यावर उधळली.श्वेता सिंघल यांचे स्वागतनवनियुक्त जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी सोमवारी सातारा जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. मावळते जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी त्यांचे स्वागत केले. आयत्या विषयांनाही मंजुरीसातारा येथील गोडोली प्रवेशद्वार ते अजिंक्यतारा किल्ला रस्त्याचे नूतनीकरण व स्ट्रीट लाईट बसविणेक्षेत्र महाबळेश्वर यात्रास्थळास ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जापाटण तालुक्यातील रस्त्यांची दर्जा उन्नतीसंगममाहुलीत महाराणी ताराबाई समाधीचा जीर्णाेद्धारवॉटर कप स्पर्धेतील तलावांची नावीन्यपूर्ण योजनेतून दुरुस्ती