मुंबईतील विधानभवनात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते फलटण येथील मुधोजी हायस्कूलच्या १९९० मधील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी उच्च पदावर पोहोचलेल्या सहअध्यायींचा सत्कार आयोजित केला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले, निवृत्त सहसचिव भाई मयेकर, माऊली फाऊंडेशन काळबादेवीचे अध्यक्ष डॉ. सिंगन, राष्ट्रवादीचे प्रदेश संघटक मोहन भोसले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सचिव महेंद्र काज, प्रा. चंद्रशेखर नेने, प्रसन्न रुद्रभटे, बाळासाहेब ननावरे, किरण बोळे उपस्थित होते.
कार्यक्रमास वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने, विशेष कार्यकारी अधिकारी संजय खानोलकर उपस्थित होते. नसीर शिकलगार, दीपाली निंबाळकर यांनी सूत्रसंचालन केले. गौरवपत्राचे वाचन शीतल साळे यांनी केले. श्रद्धा सांगळे यांनी आभार मानले.