आनंद गाडगीळ-मेढा -जावळी तालुक्यातील कुडाळ ग्रामपंचायत निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. शिंदे घराण्यातील पारंपरिक लढतीत सरशी कोणाची? याची उत्सुकता लागली आहे. त्यातच महिलांच्या आठ जागांसाठी रोहणी निंबाळकर यांनी उभे केलेले उमेदवार व सेनाप्रणित संजय शेवते यांच्या पॅनेलनेही आपले उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे ही चौरंगी निवडणूक चुरशी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील राजकीय संवेदनशील गाव म्हणून कुडाळकडे पाहिले जाते. माजी आमदार दिवंगत लालसिंगराव शिंदे यांच्या घराण्याची पकड या गावावर प्रथमपासूनच आहे. आदरयुक्त दबदबा अशी ख्याती असलेल्या दिवंगत लालसिंगराव शिंदे (काका) यांचे नेतृत्त्व कुडाळकरांनी आनंदाने स्वीकारले होते. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र दिवंगत राजेंद्र शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली कुडाळ परिसरातील ग्रामपंचयाती, तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सोसायट्या यांच्या शिंदे घराण्याची आजकही पकड आहे. गेली अनेक वर्षे सत्तेत दावेदार असलेल्या शिंदे घराण्याचे नेतृत्त्व प्रतापगड कारखान्याच्या अध्यक्षा सुनेत्रा शिंदे व त्यांचे पुत्र सौरभ शिंदे करत आहेत. आजपर्यंत झालेल्या अनेक निवडणुकीत या शिंदेंच्या नेतृत्त्वाला शह देण्याचा प्रयत्न सुरेशराव शिंदे यांनी केला. मात्र, त्यांना अपेक्षित यश आले नाही. अनेकदा यांच्यातील पारंपरिक लढती रंगतदार झाल्या. आताही ग्रामपंचायत निवडणुकीच्या निवडणुकीच्या निमित्ताने सुनेत्रा शिंदे, सौरभ शिंदे व जितेंद्र शिंदे यांच्या रयत पॅनेल व सुरेश शिंदे यांचे सुपुत्र चंद्रसेन शिंदे यांचे समर्थ पॅनेलमध्ये खरी लढत आहे.सत्ताधारी असलेल्या सुनेत्रा शिंदे यांच्या नेतृत्त्वाचा कस लागणार असल्याचे चित्र आहे. सुनेत्रा शिंदे, त्यांचे दीर जितेंद्र शिंदे यांच्यातही मध्यंतरी कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने बेबनाव झाला होता. मात्र, आता त्यांच्यात मनोमिलन झाल्याने या निवडणुकीत ते एकत्र आहेत. कोणत्याही परिस्थितीत सत्ताधारी गटाला खिंडार पाडायचे, या इर्षेने चंद्रसेन शिंदे रिंगणार आहेत. या निवडणुकीत त्यांनी सर्व जागांवर मातब्बर उमेदवार उभे केले आहेत. पंधरा जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत सात पुरुष व आठ महिला उमेदवार आहेत. या आठही महिला उमेदवारांसाठी येथील रोहिणी निंबाळकर यांच्या नेतृत्त्वाखाली नवोदय पॅनेलने उमेदवार उभे केले आहेत. तर शिवसेनेचे संजय शेवते यांनीही निवडक सात जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. हेमंत शिंदे व सोमनाथ कदम हे दोन अपक्ष नशीब अजमावत आहेत. पंधरा जागांसाठी एकूण ४७ उमेदवार असून, या ग्रामपंचायतीचे सरपंचपद हे खुला पुरुष प्रवर्गासाठी असल्यामुळे निडणुकीतील चुरस आणखीनच वाढली आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी पाच पुरुष , पाच स्त्री उमेदवार,अनुसूचित जातीसाठी एक महिला व इतर मागास प्रवर्गासाठी दोन व दोन महिला उमेदवार आहेत. एकंदरित चंद्रसेन शिंदे यांचाही या निवडणुकीत कस लागणार आहे. कुडाळ गावात रोहिणी निंबाळकर व संजय शेवते यांच्याही राजकीय कारकिर्दीस या निवडणुकीच्या निमित्ताने सुरुवात होत आहे. त्यामुळे त्यांनी ही निवडणूक गांभीर्याने घेतली आहे. प्रतिष्ठेची लढततालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मातब्बर नेत्यांपैकी एक असलेल्या सुनेत्रा शिंदे यांच्यासाठी ही निवडणूक नक्कीच प्रतिष्ठेची आहे. लालसिंगराव शिंदे, राजेंद्र शिंदे यांच्या निधनानंतर शिंदे घराण्याचे राजकीय वारसदार म्हणून भूमिका निभावणारे व शिंदे घराण्याचे नेतृत्त्व करणारे सुनेत्रा शिंदे यांचे राजकीय व्यक्तिमत्त्व अनेकदा वादळीच ठरली.प्रतापगड कारखाना, विविध कार्यकारी सेवा सोसायटी, जिल्हा मध्यवर्ती बँक या निवडणुकीत आजपर्यंत पक्षातीलच नेत्यांशी लढावे लागले आहे. मात्र, यावेळी ही निवडणूक पारंपरिक होत आहे.
तुतीची लागवड केवळ मंजूर समूहामध्येच
By admin | Published: August 02, 2015 10:00 PM