शहरं
Join us  
Trending Stories
1
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
2
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
3
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
4
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
5
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
7
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
8
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
9
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
10
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
11
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
12
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
13
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
14
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
15
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
16
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
17
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
18
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
19
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
20
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार

जिल्ह्यात बहुरंगी लढती

By admin | Published: February 13, 2017 10:56 PM

८१७ उमेदवार रिंगणात : जि. प., पं. स. निवडणुकीत शेवटच्या क्षणी नाट्यमय घडामोडी

सातारा : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सोमवारी शेवटच्या क्षणी नाट्यमय घडामोडी घडत अनेक बंडोबा थंडोबा झाले, तर काही ठिकाणी बंडाळीचा वणवा कायम राहिला. सातारा जिल्ह्याच्या निवडणूक रणांगणात एकूण ८१७ उमेदवारांचं मैदान-ए-जंग पाहण्यास मिळणार आहे. बहुतांशी ठिकाणी बहुरंगी लढती होत आहेत.खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा तालुक्यात १०४ जणांनी माघार घेतली. त्यांनी भाजपशी केलेली युतीही उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी समोर आली. काँगे्रस व भाजप या दोन टोकांच्या पक्षांना सोबत घेऊन खासदार उदयनराजे भोसले यांनी तयार केलेले ‘राजकीय रसायन’ अनेकांना विस्मित करणारे ठरले आहे. खंडाळा तालुक्यातील राजकीय आखाड्यात पक्षनेतृत्वाच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावीत पक्षाविरोधात अनेकांनी दंड थोपाटले आहेत. राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली असून, काँग्रेसने तर लोटांगण घालीत अपक्ष आघाडीच्या तंबूचा आसरा घेतला आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या चिंधड्या करीत बंडोबांनी अपक्षांचा झेंडा उभारला आहे. जिल्हा परिषदेच्या ३५ तर पंचायत समितीच्या ५६ जणांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे तालुक्यातील तीन गटांसाठी २० तर सहा गणांसाठी ३१ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.कोरेगाव तालुक्यातील पाच गटांतील २७ जणांनी माघार घेतली. त्यामुळे २२ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. दहा गणांसाठी ७६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ४० जणांनी माघार घेतल्याने आता ३६ जण आपले नशीब आजमावत आहेत. नाट्यमय घडामोडीनंतर काँग्रेसचे किन्हई पंचायत समिती गणातील उमेदवार तुकाराम वाघ यांनी अनपेक्षितरीत्या माघार घेतली, त्यानंतर काँग्रेसने लागोलाग अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात असलेल्या अ‍ॅड. अमोल राशीनकर यांचा पक्ष प्रवेश घडवित त्यांची उमेदवारी पुरस्कृत केली आहे.फलटण तालुक्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी गटातील ३९, तर गणातील ६७ अशा एकूण १०६ उमेदवारांनी तलवारी म्यान केल्या. गटाच्या ७ जागांसाठी ३३ तर गणाच्या १४ जागांसाठी ५४ उमेदवारांनी निवडणूक रिंगणात एकमेकांसमोर आव्हान उभे केले आहे. ही निवडणूक चौरंगी होत असून, निवडणुकीत काँग्रेस, स्वाभिमानी पक्ष व भाजप, रासप असे नवे समीकरण जुळले आहे. महाबळेश्वर तालुक्यातून सर्वांत कमी अर्ज मागे घेतले गेले. दोन गटांतून पाच, तर चार गणांतून पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. तळदेव गटातील शिवसेनेच्या प्रमुख उमेदवार अर्चना सचिन शेटे यांनी सोमवारी अनपेक्षितपणे अर्ज मागे घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला. निवडणुकीच्या मैदानात दोन गटांत पाच तर चार गणांतून दहा असे तालुक्यातून पंधरा उमेदवार उरले आहेत.जावळी तालुक्यात ९६ उमेदवारांनी भरलेल्या ११८ अर्जांपैकी ८० अर्ज माघारी घेतल्याने तालुक्यातील तीन गटांसाठी १२ उमेदवार तर सहा गणांसाठी २६ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. तालुक्यात प्रथमच भाजपाने सर्वच्या सर्व जागांवर उमेदवार उभे केले आहेत. सत्ताधारी राष्ट्रवादीला आता शिवसेनेबरोबरच भाजपाशीही सामना करावा लागणार आहे.वाई तालुक्यात गटासाठी १३ तर गणासाठी ३४ उमेदवार रिंगणात उरले असून, बंडोबांना थंड करण्यात पक्षश्रेष्ठींना अपयश आल्याचे समोर आले आहे.पाटण तालुक्यात गटातून २४ तर गणांतून ३८ जणांनी माघार घेतली. शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी व इतर पक्ष असा मुख्यत्वे चौरंगी लढतीचा महासंग्राम पाहावयास मिळणार आहे. फायनल देसाई-पाटणकर गटातच होणार असे दिसते. काळगाव गणातील अपक्ष उमेदवार पांडुरंग कुंभार हे उमेदवारी अर्ज बाद झाल्याच्या कारणावरून न्यायालयात गेल्यामुळे त्या गणातील अर्ज माघारीची प्रक्रिया १५ फेबु्रवारी रोजी होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रीरंग तांबे यांनी दिली. माण तालुक्यात गटाच्या २३ तर गणातील ३२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आता गटाच्या पाच जागांसाठी २४ तर गणाच्या १० जागांसाठी ४९ उमेदवार असे एकूण ७३ उमेदवार रिंगणात उरले आहेत.खटाव तालुक्यातील सहा गट व बारा गणांसाठी एकूण ९५ अर्ज दाखल झाले होते. त्यातून जिल्हा परिषदेच्या २१ तर पंचायत समितीच्या ४२ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. गटासाठी २७ तर गणासाठी ५३ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत.