लोकमत न्यूज नेटवर्कवाई : लाचखोरीची कारवाई झालेल्या नगराध्यक्षा डॉ़ प्रतिभा शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी करत शुक्रवारी पालिकेतील विरोधक व नागरिकांनी पालिकेसमोर मुडंण आंदोलन केले. नगराध्यक्षांचा जाहिर निषेध व्यक्त करत यावेळी सतरा नागरिकांनी मुंडण केले.नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे यांच्या लाचखोरी प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. नगराध्यक्षांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादी पुरस्कृत तीर्थक्षेत्र विकास आघाडीने अंदोलनाचे हत्यार उपसले आहे़ या आंदोलनाचा एक भाग म्हणून शुक्रवारी विरोधकांनी पालिकेसमोर मुंडण आंदोलन केले.सकाळी ११ वाजता विरोधक मोठ्या संख्येने पालिकेसमोर एकत्र आले. यानंतर नगराध्यक्षांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी नगराध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी करत एकूण १७ नागरिकांनी मुंडण आंदोलन केले. या आंदोलनात उपनगराध्यक्ष अनिल सावंत, तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे अध्यक्ष संजय लोळे, माजी नगराध्यक्ष भुषन गायकवाड, अॅड़ श्रीकांत चव्हाण, नगरसेवक प्रदीप चोरगे, राजेश गुरव, भारत खामकर, चरण गायकवाड यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.विरोधकांना राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार नाही...भाजपकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, वाई पालिकेतील तीर्थक्षेत्र आघाडीने नगराध्यक्षांच्या विरोधात अंदोलन उभारले आहे़ हे अंदोलन उभारणाऱ्या विरोधकांना राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार नाही़ ते केवळ वैयक्तीक आकसापोटी नगराध्यक्षांना वेठीस धरत असून पालिकेच्या कारभारला खिळ घालत आहेत. विरोधकांना नैतिकतेचा पुळका असेल तर बाजार समितीचे सभापतींचे हमालांचा गाळा हडप करण्याचे प्रकरण व पंचायत समितीचे उपसभापती यांनी पेट्रोल पंपात धांदली करून कोट्यवधी रूपयांची जनतेची लयलूट केली आहे याचा हिशोब आधी द्यावा़ विरोधकांनी आपल्या दिव्याखालचा अंधार डोळे उघडे करून पहावा, असाही आरोप निवेदनात केला आहे़
नगराध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी मुंडण
By admin | Published: June 30, 2017 11:11 PM