शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार गटाच्या २२ उमेदवारांची यादी जाहीर; बीडमधून संदीप क्षीरसागरांना पुन्हा संधी
2
टीम इंडियाला घरच्या मैदानात धोबीपछाड; न्यूझीलंडनं पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकत रचला इतिहास
3
अखेर Andheri East Assembly चा महायुतीचा उमेदवार ठरला; भाजपचा नेता शिंदेंच्या सेनेतून लढणार
4
'दरवेळी ऑफर देतात'; बाळासाहेब थोरात-संजय राऊतांबद्दल देशमुखांचा गौप्यस्फोट
5
"दिवाळीपूर्वी बंगालमध्ये दंगली आणि बॉम्बस्फोटाचा कट", मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा मोठा दावा
6
कडक सॅल्यूट! हातावरच्या रेषा नशीब ठरवत नाहीत...; डिलिव्हरी बॉयचा डोळे पाणावणारा Video
7
ऐन निवडणुकीत महाराष्ट्रात नवीन राजकीय पक्षाचा उदय; २८८ जागा लढवणार, काय आहे नाव?
8
मी ध्यानचंद खेल रत्न पुरस्कारासाठी पात्र आहे का? मनूची पोस्ट; चाहत्यांनी उडवली खिल्ली मग...
9
अमित ठाकरेंसाठी सदा सरवणकर माघार घेणार? शेलारांच्या मागणीनंतर उदय सामंतांचे महत्वाचे वक्तव्य
10
जयश्री थोरातांवरील आक्षेपार्ह वक्तव्यावर बाळासाहेब थोरातांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सुजय विखेंचे ढोंग...
11
छत्रपती संभाजीराजेंचा मनोज जरांगेंकडे युतीचा प्रस्ताव; अपक्ष उमेदवारीचे सांगितले तोटे
12
Maharashtra Assembly Election 2024: काँग्रेसने विद्यमान आमदाराचाच पत्ता केला कट; लहू कानडेंना मोठा झटका!
13
"पप्पांनी आयुष्यभराची कमाई माझ्या लग्नावर खर्च केली, अजूनही फेडताहेत कर्ज"
14
Jio, Airtel, Vi चे रिचार्ज प्लॅन्स होऊ शकतात स्वस्त, सरकारकडे केली मागणी; काय आहे प्रकरण?
15
कोण करणार करेक्ट कार्यक्रम? १५ मतदारसंघात पवार विरुद्ध पवार थेट लढत; काका-पुतणे आमनेसामने
16
Nvidia vs Apple: 'या' कंपनीनं Apple ला टाकलं मागे, भारतातही केलीये मोठी डील; काय करते कंपनी?
17
छगन भुजबळांविरोधात येवल्यातून कोण लढणार?; मविआतील 'या' नेत्यांची नावे चर्चेत
18
Jayashree Thorat: वसंतराव देशमुखांविरोधात गुन्हा; रुपाली चाकणकर म्हणाल्या, 'असं बोलणं खपवून घेणार नाही'
19
"अमित ठाकरे घरातील, महायुतीने समर्थन द्याव"; BJPच्या मागणीवर शिंदे गट म्हणतो, "सरवणकरांना डावलणं..."
20
IND vs NZ : छोटा पॅकेट बडा धमाका! सचिन-कोहलीला जमलं नाही ते 'यशस्वी' करुन दाखवलं

Crime News Satara: रस्त्यातील गाडी बाजूला काढ म्हटला, रागाने डोक्यात कोयता घातला; तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 1:56 PM

याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात आठजणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला असून, यातील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

सातारा : शतपावली करत असताना रस्त्यातील गाडी बाजूला काढ म्हटल्याच्या कारणावरून एका तरूणाच्या डोक्यात काेयत्याने वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. यामध्ये संबंधित तरूण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात आठजणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला असून, यातील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.प्रथमेश बाळासाहेब जगताप (वय २०, रा. वर्ये, ता. सातारा), आदर्श हणमंत रणखांबे (वय २१, रा. मंगळापूर, ता. कोरेगाव), अनिल रत्नदीप जाधव (वय २३, तांदूळवाडी, ता. कोरेगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, काैशल लक्ष्मण बेबले (वय २६, रा. रामनगर, सातारा) हा शुक्रवारी रात्री साठेआठ वाजता गावातूनच शतपावली करत निघाला होता. त्यावेळी वरील संशयित हे रस्त्याच्याकडेला बसले होते. त्यांनी दुचाकी रस्त्यात लावली होती. ही दुचाकी बाजूला काढ, असे काैशल बेबले याने सांगितल्यानंतर त्यांच्यामध्ये शाब्दीक वादावादी झाली. त्यानंतर सर्वजण तेथून निघून गेले. रात्री पावणेदहा वाजता वरील संशयितांनी आपले सात ते आठ मित्र आणून काैशल बेबलेवर हल्ला केला. यावेळी आदर्श रणखांबे याने काैशलच्या डोक्यात कोयता मारला. तर इतरांनी लाथाबुक्क्यांनी त्याला मारहाण केली.काैशलचे भाऊ व मित्र तेथे येताच संशयितांनी तेथून पलायन केले. गंभीर जखमी झालेल्या काैशलला तातडीने साताऱ्यातील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकाराची सातारा तालुका पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तिघा संशयित आरोपींना अटक केली. त्यांचे इतर साथीदार फरार असून, त्याचा पोलीस शोध घेत आहेत. पोलीस उपनिरीक्षक मनोहर फरांदे हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी