सातारा : देशामध्ये सरकारविरोधात बोलणाऱ्या लोकांच्या मोबाईल फोनवर पाळत ठेवून हेरगिरी करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारनेच इस्त्राईलमधील एका खासगी कंपनीकडून हे सॉफ्टवेअर खरेदी केले. मात्र, सरकार कुठलेही स्पष्टीकरण करत नाही. ही हेरगिरी म्हणजे लोकशाहीचा खून आहे, अशी सडेतोड टीका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.येथील विश्रामगृहावर प्रसारमाध्यमांशी बोलताना आ. चव्हाण यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, ह्यकेंद्रातील भाजप सरकारने सांविधानिक संस्थानं ताब्यात घेऊन लोकशाहीला मारक निर्णय घेतले आहेत. या माध्यमातू्न हुकुमशाही चालविली आहे. इस्त्राईलकडून हेरगिरीचे पॅगेसेस सॉफ्टवेअर खरेदी करण्यात आले आहे. हे स्वाफ्टवेअर केवळ सरकारला विकत असल्याचे संबंधित कंपनीने स्पष्ट केले तरी केंद्र सरकार हे मान्य करायला तयार नाही. भारतातील तब्बल १००० व्यक्तींच्या मोबाईलमध्ये हे सॉफ्टवेअर घुसवण्यात आले आहे. त्यातील वरिष्ठ पत्रकार, सरकारी अधिकारी, न्यायाधीश अशा ३०० जणांचे मोबाईल तपासले गेले आहेत. याबाबत सरकारने स्पष्टीकरण केले पाहिजे.ह्णकेंद्र सरकारने हे नियमानं व परवानगी घेऊन केलेले नाही. नागरिकांवर पाळत ठेवण्याची ही पध्दत निषेधार्ह असून या बाबीची सर्वपक्षीय समिती नेमून अथवा न्यायाधिशांमार्फत स्वतंत्र तपास होणे आवश्यक आहे, अशी मागणी आ. चव्हाण यांनी केली.राणेंचे वक्तव्य संस्कृतीला काळिमा फासणारेकेंद्रीय मंत्री व भाजपचे नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेचाही आ. चव्हाण यांनी समाचार घेतला. ह्यराजकीय जीवनामध्ये सभ्यता पाळावी लागते. राजकारणात कोणीही कोणाचा वैयक्तिक शत्रू नसतो. टीका करायची तर विचारानं करावी, मुख्यमंत्र्यांबाबत एकेरी भाषा वापरणे म्हणजे राज्यातील जनतेचा अपमान आहे. तसेच ही भाषा महाराष्ट्राला संस्कृतीलाच काळिमा फासणारी आहे.ह्ण