शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

Satara Crime: दोघांच्या मृत्यूबरोबर कोवळा जीवही झाला ‘शिकार’; मोबाइल नंबर ब्लॉक केल्याचा राग, अन् गोड बोलून केला घात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 11:45 AM

स्नेहल अडीच महिन्यांची गरोदर होती. हे ऐकल्यावरच त्याच्यात सैतान निर्माण झाला. दत्तात्रयने क्षणाचाही विचार न करता स्नेहलच्या पोटावर सपासप असंख्य वार केले

रशिद शेखऔंध : वांझोळी, ता. खटाव येथील सख्ख्या मावस भाऊ-बहिणीच्या प्रेमप्रकरणात एक कोवळा जीवही शिकार झाला. यामुळे या प्रेमप्रकरणाच्या विनाशकारी वळणाने वांझोळी परिसर अक्षरश: नि:शब्द झालाय. नात्याला काळिमा फासणाऱ्या या प्रेमाविषयी वांझोळी परिसरात प्रेम म्हणजे नेमके काय असतं, अशी चर्चा सुरू झालीय.काही महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या स्नेहलने आपल्या नवीन संसाराची स्वप्ने उराशी बाळगली होती; पण माहेरी आलेल्या स्नेहलला किंचितशीही कल्पना नसेल की पुन्हा आपण सासरी जाणार नाही. आणि मावस बहिणीच्या प्रेमात पूर्ण संतुलन बिघडलेल्या दत्तात्रयने मात्र तिला संपविण्याची पुरती तयारी केली असल्याचे दिसून आले. हातावर पोट भरून एकाच गावात दोन्ही बहिणी राहत असल्याने त्यांना किंचितही कल्पना आली नाही. दोन्हीही बहिणींच्या संसाराची अशी अवस्था होईल, असे स्वप्नातही त्यांना वाटले नव्हते. दत्तात्रयने स्नेहलला जिवे मारण्याचा अगोदरच डोक्यात कट शिजवीला होता. त्यासाठी त्याने चाकू व कोयता खरेदी करून ठेवला होता. तर पँटच्या खिशात चाकू ठेवण्यासाठी जागा करून ठेवली होती. घटनेच्या वेळी घराच्या कट्ट्यावर सर्वजण बोलत बसले होते. त्यानंतर दोन्हीही आई गेल्यानंतर दत्तात्रयने स्नेहलला ओढत आत नेले असावे, कारण त्या कट्ट्यावर बांगड्या पडल्या होत्या. विशेष म्हणजे स्नेहल अडीच महिन्यांची गरोदर होती. हे ऐकल्यावरच त्याच्यात सैतान निर्माण झाला. दत्तात्रयने क्षणाचाही विचार न करता स्नेहलच्या पोटावर सपासप असंख्य वार केले. तर इतर ठिकाणीही वार केल्यामुळे तिच्या पोटातील बाळासह दोन जीवांचा अंत झाला. त्यानंतर त्याने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली.कदाचित ती गरोदर असल्याचेही त्याला आवडले नसावे; पण या दुनियेत येण्याअगोदर कोवळ्या जीवालाही ही दुनिया पाहता आली नाही. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नीलेश देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे व सर्व पोलिस पथक जेव्हा घटनास्थळी पोहोचले. तेव्हा हे हृदयद्रावक दृश्य पाहून सारेच अवाक झाले.

मोबाइल नंबर ब्लॉक केल्याचा सर्वाधिक रागस्नेहलने दत्तात्रयचा मोबाइल नंबर ब्लॉक केल्याने अस्वस्थ तो अस्वस्थ होता. ती माहेरी येण्याची वाटच तो बघत होता. सुरुवातीला गोड बोलल्याने स्नेहलला तो काय करेल, याचा अंदाज आला नाही. त्यामुळेच ती जिवाला मुकली.

अगोदरच्या आणाभाका शपथी नडल्या!स्नेहल आणि दत्तात्रयच्या प्रेमप्रकरणात घेतल्या असणाऱ्या आणाभाका शपथी नडल्या असाव्यात, असं बोललं जातंय. नवीन संसारात रमलेल्या स्नेहलला जुन्या आठवणींना विसरून जायचे होते. मात्र, दत्तात्रयला ते विसरायचे नव्हते का, अशीही चर्चा परिसरात होती.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस