शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

इनामी जमिनीच्या वादातून केला खून

By admin | Published: December 16, 2015 11:22 PM

परभणी : शासनाकडून मिळालेल्या ईनामी जमिनीवर खोटी नोंद करून मालकी हक्क दाखविल्या प्रकरणी आरोपीविरुद्ध मयत इसमाच्या पित्याने तक्रार दिली होती.

परभणी : शासनाकडून मिळालेल्या ईनामी जमिनीवर खोटी नोंद करून मालकी हक्क दाखविल्या प्रकरणी आरोपीविरुद्ध मयत इसमाच्या पित्याने तक्रार दिली होती. या प्रकरणाचा निकाल ८ डिसेंबर रोजी लागला. आपल्या विरोधात लागलेल्या निकालाच्या वादातून आरोपीने फिर्यादीसोबत वाद घातला आणि या वादातच एकाचा खून झाला. अशा प्रकारे हा खून घडल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिल्याने वांगीरोड येथील प्रकरणाचे सत्य उलगडले आहे. शहरातील वांगीरोड भागात सर्वे नं. २५० मध्ये शासनाची जमीन आहे. ही जमीन १९९० च्या सुमारास मसियोद्दीन हफियोद्दीन शेख यांना मिळाली होती. त्यांच्या नावे ९ एकर जमीन ईनामी झाली होती. याच सर्वेमध्ये मसियोद्दीन यांच्या बहिणीच्या नवऱ्याने नावे अमिरोद्दीन गौसोद्दीन शेख यांनी १९९२ ला ६ एकर शेत असल्याचे कागदोपत्री लिहून घेतले होते. त्यावेळी १९९२ ला मसियोद्दीन यांनी अमिरोद्दीन यांच्या विरोधात खोटी नोंद करीत दावा केल्याची तक्रार दिली होती. हे प्रकरण न्यायालयात २०१५ पर्यंत सुरू होते. या प्रकरणाचा निकाल ८ डिसेंबर २०१५ रोजी लागला. यामध्ये निकाल मसियोद्दीन यांच्या बाजूने लागला. त्यानंतर १३ डिसेंबर रोजी आरोपी अमिरोद्दीन यांचा मुलगा व मसियोद्दीन यांचा मुलगा यांच्यात शेतातील पाईप घेण्याच्या कारणावरून वाद झाला. झालेला प्रकार अमिरोद्दीन यांच्या मुलाने त्यांच्या घरात सांगितला. त्यानंतर अमिरोद्दीन यांच्या घरातील त्यांचा मुलगा महंमद अमिरोद्दीन, पत्नी गोरीबीन अमिरोद्दीन, रहिसोद्दीन व अमिरोद्दीन यांनी मसियोद्दीन यांच्या कुटुंबाशी वाद घातला. १४ डिसेंबर रोजी झालेल्या वादात मसियोद्दीन यांचा मुलगा अजहर मसियोद्दीन हा मृत्यू पावला. तर मसियोद्दीन यांच्यावर नांदेड येथे उपचार सुरू आहेत. घटना घडल्यानंंतर सुरुवातीला हा खून कशामुळे झाला? हे समोर आले नव्हते. शेतीचा वाद असल्याचे बोलले जात होते. या प्रकरणी नवामोंढा पोलिसात गुन्हा नोंद झाला. पोलिसांनी दोन दिवसात तपासाची चक्रे गतीने फिरवून चार आरोपींना अटक करीत मूळ खुनाचे कारण आरोपीकडून कबूल करून घेतले आहे. यामुळे झालेला खूनाचा प्रकार हा ईनामी जमिनीच्या वादातून घडल्याचे समोर आले.