शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
3
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
4
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
5
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
6
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
7
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
8
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
9
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
10
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
11
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
12
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
13
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
14
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
15
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
16
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
17
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
18
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
19
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
20
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 

वडजल येथील खुनाचा तीन दिवसांत छडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2019 3:23 PM

वडजल, ता. फलटण येथे झालेल्या खूनप्रकरणाचा छडा तीन दिवसांत लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून, हा खून पूर्व वैमनस्यातून झाला असल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील दोघांना अटक केली आहे.

ठळक मुद्देवडजल येथील खुनाचा तीन दिवसांत छडाअकलूजमधील दोघांना अटक : पूर्व वैमनस्यातून प्रकार

सातारा : वडजल, ता. फलटण येथे झालेल्या खूनप्रकरणाचा छडा तीन दिवसांत लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून, हा खून पूर्व वैमनस्यातून झाला असल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील दोघांना अटक केली आहे.रोशन अविनाश भोसले (वय २०), सनी उर्फ भोलेशंकर चंद्रकांत भोसले (वय १८, दोघेही रा. इंदिरानगर झोपडपट्टी अकलूज, सोलापूर, सध्या रा. बडेखान, ता. फलटण) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रकाश फोरमन पवार (वय ४०, रा. शिंदेवाडी, ता. फलटण) यांचा २९ नोव्हेंबर रोजी फलटण येथील वडजल गावच्या हद्दीत गळा चिरून खून करण्यात आला होता. आरोपींनी पाठीमागे कसलेही पुरावे सोडले नव्हते. त्यामुळे हा खून उघडकीस आणणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञातावर खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.दरम्यान, रोशन आणि सनी भोसले हे दोघे घटनेदिवशी प्रकाश पवार याच्यासोबत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला खबऱ्याकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोघांचा शोध सुरू केला. त्यावेळी रोशन भोसले हा पुणे येथे तर सनी भोसले हा अकलूजला पळून गेल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने दोन टीम तयार करून आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली.

पुणे व सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथून वेगवेगळ्या ठिकाणाहून दोघांनाही पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी प्रकाश पवार याचा खून केल्याची कबुली दिली. प्रकाश पवार व आरोपींच्या कुंटुंबीयांचा पैशाच्या देवाण घेवाणवरून वाद होता.

तसेच प्रकाश पवार यांच्या नात्यातील मुलगी आरोपी यांच्या नात्यातील एका व्यक्तिने घेऊन गेला होता. यावरून मयत प्रकाश पवार हे आरोपींना व त्यांच्या नातेवाईकांना फलटणला आल्यास सतत गाडी अडविणे, मारहाण करणे असे प्रकार करत होता. त्यामुळे रोशन आणि सनी हे दोघे चिडून होते.फलटणमधील श्रीराम रथ यात्रेसाठी २७ नोव्हेंबर रोजी रोशन आणि सनी हे दोघे आले होते. सायंकाळी सात वाजता यात्रेतून परत जात असताना जिंतीनाका परिसरामध्ये प्रकाश पवार हा दारू पिऊन रस्त्यावर पडलेला त्यांना दिसला. त्याला घेऊन ते वडजल रस्त्यावरील निर्जनस्थळी घेऊन गेले. कटरच्या साह्याने पवार याचा गळा चिरून खून केला. त्यानंतर तेथून ते पसार झाले. या दोघांसमवेत आणखी एकजण होता. पोलीस त्याचाही शोध घेत आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय कुंभार, पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जºहाड, हवालदार उत्तम दबडे, पोलीस नाईक योगेश पोळ, प्रवीण फडतरे, अजीत कर्णे, प्रवीण कडव, विक्रम पिसाळ, वैभव सावंत, संजय जाधव यांनी केली. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर