शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने साताऱ्यात पाश्चिमात्य वाद्य अन् पारंपरिक गाण्यांची संगीत सेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 10:14 PM

नटराज मंदिरमध्ये कार्यक्रम : साताऱ्यातील २५ गिटार वादकांचे अद्भभूत सादरीकरण.

लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : ज्या वाद्याचा वापर जॅझ, राॅक या प्रकारांसाठीच जगभर केला जातो, त्या वाद्याच्या संगतीने नटराज मंदिरात चक्क शास्त्रीय गायनाची मैफिल रंगली. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात २५ गिटार वादकांनी आपली संगीत सेवा दिली.

येथील श्री उत्तर चिदंबरम नटराम मंदिरात नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने गिटार गुरू प्रतिक सदामते यांच्या विद्यार्थ्यांनी ही संगीत सेवा दिली. कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील सुर निरागस हो या गीताने मैफिलीची सुरूवात झाली. त्यानंतर नमो नमो जी शंकरा हे गीत विद्यार्थ्यांनी सादर केले. गिटारवर या गितांचे सादरीकरण एेकुन सर्वचजण मंत्रमुग्ध झाले. शास्त्रीय गायिका वनिता कुंभार यांनी सादर केलेल्या माझी रेणुका माऊली, काैसल्येचा राम या गीतांनी अनोखा माहोल तयार केला. त्यांना अमित जाधव यांनी तबल्यावर साथ केली. मनमंदिरा, राधा कैसे ना जले ही गीते प्रतिक सदामते यांनी सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी सदामते यांनी केले. या अनोख्या कार्यक्रमाला भक्तांनी उत्सफुर्त दाद दिली.

१. यांनी दिली संगीत सेवामुख्य गीटारवादक प्रतिक सदामते, विजय साळुंखे, अनुजा बोकील, चैत्रा स्वामी, गार्गी रेवले, यश केंजळे, ऋजुता जोशी, गायन वनिता कुंभार, गीटार साथ शरयू साखरे, सेल्वी शेजवळकर, श्रेया डोंगरे, आरोही मंडोवारा, अद्वैत ढवळकीर, अनन्या लिपारे, अर्णव पवार, आयुष काटकर, डाॅ. सुनिता चाैधरी, आदिनाथ बागवडे, सारिका गोहेल, वेदश्री देशपांडे, सइर् कर्वे, शुभांगी घाडगे, विनीत कदम, राघव फरांदे आणि तेजस माने.

पाश्वात्य संगीताचा हक्काचा साथीदार म्हणून गीटारकडे पाहिले जाते. पण भारतीय शास्त्रीय संगीतातही गीटाराची लय काय जादू करू शकते याचा अनुभव नटराज मंदिरातील कार्यक्रमात उपस्थितांनी अनुभवली. यात सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या कष्टाला टाळ्यांच्या गजरात उपस्थितांनी दाद दिली हे महत्वाचे.- वनिता कुंभार, गायिका

टॅग्स :Satara areaसातारा परिसर