शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
2
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
3
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
4
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
5
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
6
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
7
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
8
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
9
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
10
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
11
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
12
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
13
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
14
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
15
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
16
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
17
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
18
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
19
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
20
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले

मराठा महामोर्चासाठी मुस्लीम बांधवांची वाहने

By admin | Published: September 30, 2016 1:21 AM

शिरवळमध्ये बैठक : उद्योजकांकडून अल्पोपाहाराची सोय

शिरवळ : सातारा महामोर्चासाठी मुस्लीम समाजातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी वाहने कमी पडल्यास आपल्याकडील ट्रक उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. तसेच महामोर्चाकरिता उपस्थित राहणाऱ्या मोर्चेकऱ्यांकरिता उद्योजकांकडून अल्पोपाहाराची सोय केली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक समाजातील प्रत्येक व्यक्तीने हिरीरीने व स्वयंस्फूर्तीने आपापल्यापरीने वाटा उचलत सातारा येथे सोमवार, दि. ३ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या ऐतिहासिक मराठा महामोर्चा यशस्वी करण्यासाठी शिरवळ बंदची हाक देत हजारो शिरवळकरांच्या उपस्थितीमध्ये महामोर्चामध्ये सहभागी होण्याचा शिरवळकरांनी निर्धार व्यक्त केला. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. सातारा या ठिकाणी मराठा समाज बांधवांच्या वतीने ऐतिहासिक मराठा महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर शिरवळ येथील दिवंगत तुकाराम कबुले सभागृह या ठिकाणी मराठा समाजबांधव यांच्या वतीने महामोर्चाकरिता नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी एक मराठा लाख मराठा, जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी हजारो शिरवळकरांनी नियोजन बैठकीकरिता उपस्थिती दर्शवत महामोर्चामध्ये शिरवळकर मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.यावेळी प्रथमत: कोपर्डी येथील पीडितेला व जम्मू-काश्मीर येथील उरी या ठिकाणी दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित शिरवळकरांनी उत्स्फूर्तपणे आपले योगदान देत कोणी ट्रक, महाविद्यालयीन युवतींकरिता बसेस, चारचाकी वाहने, टेम्पो तसेच महामोर्चाकरिता शिरवळ परिसरात वाहने कमी पडल्यास प्रसंगी इतर जिल्ह्यांतून मोर्चाकरिता वाहने उपलब्ध करण्यात येणार आहे. यावेळी तमाम शिरवळकरांनी मोर्चाकरिता शिरवळ परिसरातील औद्योगिक कंपन्यांना सुटी द्यावी, असे आवाहन केले आहे. यावेळी शिरवळ मुस्लीम समाज, माळी समाज, तिळवण तेली समाज, भटक्या विमुक्त समाज, कैकाडी समाज, मारवाडी, समाज बांधवांच्या वतीने व व्यापारी वर्ग यांनी मराठा क्रांती महामोर्चाला पाठिंबा व्यक्त करत महामोर्चामध्ये हिरीरीने सहभागी होणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. दरम्यान, सोमवार, दि. ३ रोजी सातारा या ठिकाणी जाण्याकरिता शिरवळ ग्रामदैवत अंबिका मातेच्या मंदिरामध्ये येण्याचे व तेथून रॅलीद्वारे सातारा येथील महामोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी शिरवळ बंदची हाक देत हजारो शिरवळकर विविध समाजबांधव मराठा क्रांती महामोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. (प्रतिनिधी)सर्वच समाजांच्या एकजुटीचा प्रत्ययविशेष म्हणजे प्रत्येक समाजातील प्रत्येक व्यक्तीने हिरीरीने व स्वयंस्फूर्तीने आपापल्यापरीने वाटा उचलत मोर्चेकऱ्यांकरिता टोप्या, काळी रिबीन, वाहनांकरिता व महामोर्चामध्ये सहभागी असणाऱ्या व्यक्तींकरिता भगवे झेंडे, तसेच पाण्याचे बॉक्स उपलब्ध करण्याचा निर्धार व्यक्त करत मराठा समाजाच्या व इतर समाजाच्या एकजुटीचा प्रत्यय दिला आहे.