शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

परप्रांतीय कामगाराच्या खुनाचे गूढ उलगडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 12:34 PM

अलगुडेवाडी, ता. फलटण हद्दीत असणाऱ्या महाराष्ट्र फूडस प्रोसेसिंग अ‍ॅण्ड कोल्ड स्टोरेज या कंपनीतील परप्रांतीय कामगाराच्या खुनाचे गूढ उलगडण्यात पोलिसांना यश आले. पैशाच्या कारणातून निर्घृण खून झाल्याचे समोर आले असून, पोलिसांनी कंपनीतीलच कामगार नुरजमाल मोजीबार रोहमन (रा. हातीपोटा, राज्य आसाम) याला अटक केली आहे.

ठळक मुद्देपरप्रांतीय कामगाराच्या खुनाचे गूढ उलगडलेपैशावरून कृत्य ; कंपनीतीलच कामगाराला अटक

सातारा : अलगुडेवाडी, ता. फलटण हद्दीत असणाऱ्या महाराष्ट्र फूडस प्रोसेसिंग अ‍ॅण्ड कोल्ड स्टोरेज या कंपनीतील परप्रांतीय कामगाराच्या खुनाचे गूढ उलगडण्यात पोलिसांना यश आले. पैशाच्या कारणातून निर्घृण खून झाल्याचे समोर आले असून, पोलिसांनी कंपनीतीलच कामगार नुरजमाल मोजीबार रोहमन (रा. हातीपोटा, राज्य आसाम) याला अटक केली आहे.याबाबत अधिक माहिती अशी, सोमेर सोहेबराव अली (वय २७, मूळ रा. फौजदारचर, ता. चाफर, राज्य आसाम) हा कामगार गेल्या काही वर्षांपासून अलगुडेवाडी येथील कंपनीत कामाला होता. दरम्यान, सोमेर याच्यावर दि. २५ रोजी अज्ञाताने धारदार शस्त्राने वार करुन त्याचा मृतदेह चिलरमध्ये टाकला होता.

बुधवारी पहाटे ही घटना उघडकीस आल्यानंतर फलटण शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घऊन मृतदेहाचा पंचनामा केला होता. त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी फलटण येथे तळ ठोकून फलटण शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांच्या पथकाला तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर एलसीबी व फलटण पोलीस यांच्या संयुक्त पथकांनी मृत व संशयितांच्या कामाच्या वेळा, वैयक्तीक संबंध याची माहिती इतर कामगारांकडून घेतली.

सुमारे दोनशे कामगारांकडे पोलिसांनी चौकशी केली. मात्र, काहीच धागेदोरे हाती लागत नव्हते. अखेर पोलिसांनी नुरजमाल याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने आपणच पैशाच्या कारणातून खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यामुळे या खुनाचा उलगडा झाला. मयत सोमेर अली आणि आरोपी नुरजमाल रोहमन हे दोघे सांगली येथेही एकत्र काम करत होते. तसेच ते एकाच गावचे आहेत, असे पोलिसांनी सांगितले.आरोपी नुरजाल रोहमन याला न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पोमण हे करत आहेत. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, पोलीस निरीक्षक प्रताप पोमण, फलटणचे पोलीस उपनिरीक्षक एस. ए. बनकर, हवालदार रत्नसिंह सोनवलकर, उत्तम दबडे, सर्जेराव सूळ, रवींद्र वाघमारे,विक्रम पिसाळ, विशाल पवार, विजय सावंत, शरद तांबे यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनSatara areaसातारा परिसर