दहिवडी : राज्यात आज सगळीकडे निवडणुकीच्या निकालाची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. विविध जिल्ह्यांमधील १०६ नगरपंचायतींमधील ३३६ जागांसाठी झालेल्या मतदानाचे निकाल हाती लागत आहेत. यात अनेक ठिकाणी दिग्गजांना धक्का बसलेला दिसून येत आहे. सातारा जिल्ह्यातील दहीवडी नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने अपक्ष उमेदवाराच्या साथीने सत्तांतर घडवले आहे.आमदार जयकुमार गोरे गटाच्या फक्त पाच जागा निवडून आल्या. अंतर्गत लाथाळ्या, कुरघोड्या या निवडणुकीत भाजपला नडली असल्याचे मतदानातून दिसून आले.दहिवडी नगरपंचयतीच्या निवडणुकीमध्ये 17 जागा पैकी राष्ट्रवादी काँग्रेसने 8 जागा मिळवल्या. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस ने पाठिंबा दिलेले राजेंद्र साळुंखे हे सर्वाधिक मतांनी निवडून आले. भाजपला 5 जागेवर तर शिवसेनेला 3 जागेवर समाधान मानावे लागले.निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे प्रभाग 1 - सुरेखा विजय पखाले - शिवसेनाप्रभाग 2 - वर्षांराणी बाळासाहेब सावंत - राष्ट्रवादीप्रभाग 3 - विजया रविंद्र जाधव - शिवसेनाप्रभाग 4 - महेश जाधव - राष्ट्रवादीप्रभाग 5 - शैलेंद्र खरात - शिवसेनाप्रभाग 6 - धनाजी जाधव - भाजपप्रभाग 7 - उज्वला अमर पवार -भाजपप्रभाग 8 - मोनिका सूरज गुंडगे - राष्ट्रवादीप्रभाग 9 - नीलम अतूल जाधव - भाजपप्रभाग 10 - नीलिमा सुनिल पोळ - राष्ट्रवादीप्रभाग 11 - राणी तानाजी अवघडे - भाजपप्रभाग 12 - राजेंद्र साळूंखे - अपक्षप्रभाग 13 - विशाल पोळ - राष्ट्रवादीप्रभाग 14 - सागर पोळ - राष्ट्रवादी प्रभाग 15 - रूपेश मोरे -भाजपप्रभाग 16 - सुरेंद्र मोरे - राष्ट्रवादीप्रभाग 17 - सुप्रिया महेंद्र जाधव - राष्ट्रवादीएकूण संख्याबळराष्ट्रवादी = ८भाजप = ५शिवसेना = ३अपक्ष = १
दहिवडी नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीने घडवले सत्तातंर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 1:01 PM