सातारा : जिल्हामध्ये नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चार नगरपंचायती ताब्यात ठेवून बालेकिल्ल्यातील करिश्मा पुन्हा दाखवला आहे. कोरेगाव नगरपंचायतीमध्ये आमदार शशिकांत शिंदे यांच्या गटाला पराभूत करून आमदार महेश शिंदे यांच्या गटाने सत्तांतर घडवले आहे. कोरेगाव वगळता राष्ट्रवादी इतर पाच नगरपंचायतीमध्ये बहुमतापर्यंत पोहोचू शकेल अशी परिस्थिती आहे.वडूजमध्ये भाजप राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच..वडूजमध्ये भाजपने सहा जागांवर विजय मिळवला आहे तर राष्ट्रवादीला पाच जागा मिळाल्या आहेत. या ठिकाणी चार अपक्षांनी उमेदवारांनी करिश्मा करून दाखवला असून काँग्रेसला एक जागा मिळाली आहे. वंचित बहुजन आघाडीने एक जागा मिळवत खाते उघडले तर कॉंग्रेसला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.
खंडाळा, लोणंद मध्ये मकरंद आबांचा करिष्मा
खंडाळा आणि लोणंद या नगर पंचायतींमध्ये आमदार मकरंद पाटील यांचा करिश्मा पुन्हा एकदा पाहायला मिळाला. पंचायतींमध्ये राष्ट्रवादीने बहुमत मिळवत सत्ता खेचून आणली आहे. खंडाळा नगरपंचायतीमध्ये भाजपने दिलेली झुंज अपुरी ठरली.पाटणमध्ये राज्यमंत्र्यांना धक्का
पाटण नगरपंचायतीमध्ये गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांना धक्का देणारा निकाल लागला आहे. सत्यजित पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने १७ पैकी १५ जागांवर विजय मिळवत सत्ता कायम ठेवली आहे तर शिवसेनेला अवघ्या दोन जागा मिळाल्या.कोरेगावात भगवा फडकलाकोरेगाव नगरपंचायत निवडणुकीमध्ये आमदार शशिकांत शिंदे यांच्या विरोधकांना एकत्र करून कोरेगाव नगरपंचायतमध्ये भगवा फडकवण्याचा आमदार महेश शिंदे यशस्वी झाले. कोरेगाव मधील पराभव आमदार शशिकांत शिंदे यांच्या साठी धक्कादायक ठरला आहे.
दहीवडीत राष्ट्रवादीची सरशी
दहिवडीमध्ये आमदार जयकुमार गोरे यांना धक्का देत प्रभाकर देशमुख, मनोज पोळ यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आठ जागांवर विजय मिळवला आहे. एका अपक्षांची राष्ट्रवादीला साथ मिळाल्यास याठिकाणी राष्ट्रवादीचे बहुमत पूर्ण होणार आहे.*पाटण नगरपंचायत निकाल*
*राष्ट्रवादी विजयी*राष्ट्रवादी -१५शिवसेना - २*कोरेगाव नगरपंचायत**शिवसेना विजयी*शिवसेना -१३राष्ट्रवादी -४
*वडूज नगरपंचायत*
भाजप-६राष्ट्रवादी -५अपक्ष -४काँंग्रेस -१वंचित- १*दहिवडी नगरपंचायत*राष्ट्रवादी -८भाजप -५शिवसेना -३अपक्ष -१*लोणंद नगरपंचायत**राष्ट्रवादी विजयी*राष्ट्रवादी- १०काँग्रेस -३भाजप- ३अपक्ष -१
*खंडाळा नगरपंचायत**राष्ट्रवादी विजयी*राष्ट्रवादी-१०भाजप-७