सातारा : शहरातील अतिक्रमणाविरोधात दोन दिवसांपासून अतिक्रमण हटाव मोहीम राबविली आहे. या मोहिमेविरोधात खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झाले. कारवाई सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन त्यांनी ‘गाडेधारकांना आधी नोकऱ्या द्या; मग अतिक्रमण हटवा. यांच्या गाड्यांना हात लावाल तर माझ्याइतकं वाईट नाही,’ अशी तंबीच त्यांनी दिली. त्यानंतर प्रशासनाने वरिष्ठांशी फोन करून ही मोहीम काही काळासाठी गुंडाळली.सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस व पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारपासून सातारा शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जात आहे. यामध्ये शुक्रवारी पोवई नाक्यापासून मध्यवर्ती बसस्थानक व जिल्हा परिषद परिसरातील अतिक्रमणे काढली होती. दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी दहा वाजता पोवई नाक्यापासून बॉम्बे रेस्टॉरंट चौक दरम्यानचा रस्ता मोकळा करण्यात आला. हे पथक दुपारी साडेबाराच्या सुमारास उड्डाणपूल परिसरातील अतिक्रमणे काढत असतानाच खासदार उदयनराजे भोसले यांची तेथे एंट्री झाली. त्यानंतर हातगाडी व्यावसायिकांनी त्यांच्या संतप्त भावना खासदार उदयनराजे भोसले यांच्याजवळ व्यक्त केल्या. त्यानंतर उदयनराजे यांनी पथकातील संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून मोहीम थांबविण्यास सांगितले. ‘बेकारांना आधी नोकऱ्या द्या, अतिक्रमणाचे पुन्हा बघू. यांच्या गाड्यांना कोणी धक्का लावला तर माझ्याइतकं वाईट नाही,’ अशी तंबीच देत ‘कोणी प्रसिद्धीसाठी स्टंट करत असतील तर ते चालवून देणार नाही,’ असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)चारनंतर पुन्हा कारवाईउड्डाणपुलाजवळील कारवाई दुपारी थांबविल्यानंतर सायंकाळी साडेचार वाजता प्रचंड पोलिस बंदोबस्तात मोहिमेस पुन्हा सुरुवात केली. त्यानंतर पाटबंधारे विभागापर्यंत ही मोहीम सुरू होती. सायंकाळी सहा वाजता ही मोहीम थांबविण्यात आली. स्वच्छ व सुंदर सातारा मोहिमेला हातगाडीधारकांचा विरोध नाही. परंतु हातगाडीधारकांचे पुनर्वसन करण्याची मागणी यापूर्वीच केली आहे. पर्यायी जागा न दिल्यास हातगाडीधारक पुन्हा त्या जागी जाऊन बसतील.- संजय पवार, शहराध्यक्ष, आयटक सलग्न, सर्व धर्मीय बेरोजगार हॉकर्स संघटनादीडशे व्यावसायिकांची सोयतहसील कार्यालयाच्या पाठीमागील जागा ‘हॉकर्स झोन’ केली आहे. त्या ठिकाणी सर्व सुविधा पुरविल्यास शंभर ते दीडशे व्यावसायिकांची सोय होऊ शकते. त्यामुळे सातारकरांनी एकाच ठिकाणी सर्व साहित्य मिळू शकेल. तसेच शहराचा मोठा प्रश्न निकाली निघणार आहे, अशी सूचना काही नागरिक यावेळी करत होते. पोवई नाका ते शासकीय विश्रामगृह रस्त्याने घेतला मोकळा श्वास१ मोहिमेला सकाळी साडेनऊ वाजता पोवई नाक्यापासून सुरुवात झाली. पोवई नाक्यापासून शासकीय विश्रामगृह दरम्यानचा रस्ता मोकळा केला. उड्डाण पुलाजवळच्या आठ ते दहा टपऱ्याही जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त केल्या. यामध्ये बंद टपऱ्या जागेवर तोडल्या तर सुस्थितीतील तीन ते चार टपऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाने जप्त केल्या. २ उड्डाणपुलाजवळच्या एका विश्रामगृहात काही लोक बेकायदेशीरीत्या राहत असल्याचे आढळून आले. यावेळी ते विश्रामगृहही पाडण्यात येणार होते. परंतु आतमध्ये लोक राहत असल्याने त्यांना रिकामे करण्यासाठी मुदत देण्यात आली. ३ त्यानंतर सायंकाळी चारच्या सुमारास कडेकोट पोलिस बंदोबस्त बोलावून मोहिमेला पुन्हा सुरुवात केली. सायंकाळी सहा वाजेपर्यंत पाटबंधारे विभागाजवळ ती थांबविण्यात आली.अन्नपदार्थांचीही नासधूसशाळा-महाविद्यालय, नोकरीसाठी शहरात येणाऱ्या गोरगरिबांच्या पोटाला रस्त्याकडेच्या हातगाड्यांचा मोठा आधार असतो. मात्र, या पथकाने वडापाव, कांदाभज्यांचे गाडेच उचलले. त्यामुळे सर्व साहित्य, भजे रस्त्यावर पडले होते. ते गोळा करण्यात महिला व्यस्त होती.साहित्य उघड्यावरही मोहीम पोवई नाक्याकडून कारवाई करत येत असताना काही हातगाडी चालकांनी गॅस सिलिंडर, शेकडी व इतर साहित्य स्वत:च सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवले होते. पण याचेही पुन्हा नुकसान करणार नाहीत, ना या भीतीनेही मुलगी भेदरलेल्या नजरेने कारवाईकडे पाहत होती.रसवंतगृह चालकांनीच उचलला ऊसउन्हाळ्याची चाहूल लागली आहे. ग्रामीण भागातून विविध कामांनिमित्त साताऱ्यात येणाऱ्या ग्रामस्थांना उन्हापासून थंडावा मिळावा, यासाठी उड्डाण पुलाखाली एक-दोन ठिकाणी अतिक्रमण करून रसवंतीगृह सुरू केले होते. शुक्रवारी अतिक्रमण विरोधी मोहीम सुरू केल्यानंतर हे पथक संबंधित वस्तूंची मोडतोड किंवा जप्त करत होते. त्यामुळे नुकसान होऊ नये म्हणून या रसवंतगृह चालकांनी धावपळ करत गुऱ्हाळ साहित्यांसह ऊस स्वत:हून इतर वाहनांमध्ये भरून सुरक्षित ठिकाणी नेला.
जयपूरच्या बैठकीत नागपूरचे बुकी?
By admin | Published: March 18, 2017 10:17 PM