शिरवळ : शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचे आॅनलाईन अर्ज भरण्याचे तीन तेरा वाजले असून खंडाळा तालुक्यातील शेतकºयांची भरलेली माहिती नाशिक जिल्ह्यातील शेतकºयाच्या नावावर निघत आहे. यानिमित्ताने शासनाचा गलथान कारभार समोर आला असून शेतकºयांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासनाने अनेक निकष लावत पीक कर्ज घेतलेल्या शेतकºयांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या नावाने कर्जमाफी जाहीर केली. कर्जमाफी जाहीर केल्याने शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र शासनाने कर्जमाफी जाहीर केल्यापासून अनेक प्रकारची बंधने घातलेले परिपत्रक जाहीर केल्यानंतर शेतकºयांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. त्यामध्येच शासनाने योजनेचे खरे लाभार्थी मिळावेत, यासाठी शेतकºयांची संपूर्ण माहिती महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरून आॅनलाईन भरण्याच्या सूचना केल्या. ग्रामीण भागात ज्याठिकाणी इंटरनेटच्या सुविधा आहे. त्याठिकाणी शेतकºयांनी धाव घेत आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी तासन्तास ताटकळत बसावे लागले. शासनाच्या आॅनलाईन अर्ज भरण्याच्या योजनेला सोसायटीसह बँकांनी हरताळ फासत आॅनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेपासून हात झटकल्याने तसेच शासनाने कोणत्याही प्रकारची व्यवस्था गावांमधून अर्ज भरण्यासाठी निर्माण न केल्याने शेतकºयांवर इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती झाली आहे. त्यामध्येच गेल्या दोन दिवसांपासून खंडाळा तालुक्यातील इंटरनेट सेवेसह शासनाच्या वेबसाईटचा सर्व्हर डाऊन होत असल्याने अर्ज भरणाºया महा ई सेवा केंद्र, सेतू, सायबर कॅफे यामध्ये शेतकºयांना अर्ज भरण्यासाठी बसावे लागत आहे. त्यामध्येच शासनाच्या गलथान कारभाराचा फटका शेतकºयांना बसत आहे.
संबंधित कर्जमाफी योजनेचे आॅनलाईन अर्ज भरताना कर्जमाफी संदर्भातील माहिती भरल्यानंतर प्रिंट मारताना खंडाळा तालुक्यातील बबन सीताराम ढमाळ या शेतकºयाची माहिती ही नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील चापडगाव या गावातील दत्तू चौधरी या शेतकºयाच्या नावावर निघाली. त्यामुळे शासनाच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकारच्या संदर्भातील अशी अनेक प्रकरणे खंडाळा तालुक्यातील अर्ज भरणाºया केंद्रावर निर्माण झाल्याने संबंधितांनी शासनाच्या कर्जमाफी योजनेचे अर्ज भरण्याची मोहीम स्थगित केली आहे.
यामुळे खंडाळा तालुक्यातील कानाकोपºयातून आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी आलेल्या शेतकºयांना तासन्तास ताटकळत बसत रिकाम्या हाताने परत घराकडे परतावे लागले. यामुळे कर्जमाफी योजनेच्या संदर्भात शेतकºयांवर नको रे बाबा, अशी म्हणण्याची वेळ आणली आहे.‘पीकविमा‘च्या वेबसाईटचाही गोंधळ...
शासनाने पीकविमा भरण्यासाठी अनेक निकष लावत आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया राबिवली. मात्र, हे करीत असताना शासनाच्या पीकविम्याच्या वेबसाईटचे तीन तेरा वाजत आहेत. वेबसाईट सतत डाऊन राहिल्याने व शासनाने दिलेली मुदतही संपल्याने खंडाळा तालुक्यातील अनेक शेतकरी पीकविमा योजनेपासून वंचित राहिले आहेत.