नांदगाव (ता. कऱ्हाड) येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या इमारतीचे सोमवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्याने मोठे नुकसान झाले. इमारत व साहित्य मिळून सुमारे ३ लाखांचे नुकसान झाले आहे.
हायस्कूलच्या रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेच्या इमारतीवरील छत उडून बाजूला पडले आहे. त्यामुळे इमारतीच्या तरक्या पाकाड्या व लोड्याची पडझड झाली आहे. त्याचे सुमारे ७५ हजारांचे नुकसान झाले आहे, तर प्रयोगशाळेतील काचेची व इतर उपकरणांची यात मोडतोड होऊन सुमारे २ लाख २० हजारांवर नुकसान झाले आहे.
दरम्यान, हायस्कूल नजीकच्या विकास विलास पाटील यांच्या जनावरांच्या शेडचेही अंदाजे २० हजारांचे नुकसान झाले आहे. या दोन्ही ठिकाणचे पंचनामे तलाठी एस. आर. ढवण यांनी केले आहेत.
फोटो :न्यू इंग्लिश स्कूलच्या इमारतीचे झालेले नुकसान.