दत्ता यादव ।सातारा : खंडणी, दरोडे, मारामारी, अत्याचार करणाºया गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणाºया जिल्हा पोलीस दलातील काही पोलीस अधिकाऱ्यांच्या जिगरबाज कामगिरीमुळे साताऱ्यात अद्यापही शांतता नांदतेय. तर दुसरीकडे नुकत्याच बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या धडाकेबाज कामगिरीचे सातारकर स्मरण करत आहेत.
गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून ओळखली जाणारी स्थानिक गुन्हे शाखा. या शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी सूत्रे स्वीकारल्यापासून अनेक गुंतागुंतीचे गुन्हे उघडकीस आले. जिल्'च्या कोणत्याही कानाकोपऱ्यात घडलेला गुन्हा उघडकीस आणण्यात एलसीबीचा हातखंडा आहे. घनवट यांचा कार्यकाळ संपल्याने यंदा त्यांची नियमानुसार बदली होती. मात्र, त्यांच्या चांगल्या कामगिरीची दखल घेऊन त्यांना आणखी एक वर्षाचा कार्यकाल वाढवून देण्यात आला आहे. खून, अत्याचार, दरोडे यासारखे गंभीर गुन्हे घनवट यांनी अवघ्या काही तासांत आपल्या टीमच्या सहकार्याने उघडकीस आणले आहेत.पूर्वी सातारा तालुका पोलीस ठाण्याची धुरा सांभाळलेले पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांचाही त्यांच्या चांगल्या कामगिरीमुळे कार्यकाल वाढवून देण्यात आला आहे. अशा प्रकारचे अधिकारी जिल्हा पोलीस दलात कार्यरत असल्यामुळे साताऱ्यात शांतता नांदतेय. नाळे यांनीही सातारा तालुका पोलीस ठाण्याची धुरा सांभाळताना लूटमारीचे अनेक गुन्हे उघडकीस आणले होेते. प्रेमीयुगुलांना निर्जनस्थळी मारहाण करून लुटण्यात येत होते, त्यामुळे साताऱ्याच्या पर्यटनावर परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळे याची तत्काळ दखल घेऊन नाळे यांनी लूटमार करणाºया टोळीचा छडा लावला. नाळे हे सध्या महाबळेश्वरमध्ये कार्यरत आहेत. या ठिकाणीही अनेकदा जातीय तेढ निर्माण झाला होता. मात्र, त्यांनी चांगल्या प्रकारे यातून तोडगा काढला. त्यामुळे दोन्ही समाजामध्ये सलोख्याचे संबंध निर्माण झाले.
खंडाळा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहायक पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांची सध्या पुणे ग्रामीण येथे बदली झाली आहे. त्यांचा कार्यकाळही साताºयातील लोकांच्या स्मरणात राहील. हांडे यांनी वाहतूक शाखेचे कारभारी म्हणून कार्यरत असताना शहराला वाहतुकीची शिस्त लावली. अनेकदा त्यांच्यावर टीकाटिपणीही झाली. मात्र, त्यांनी आपल्या कर्तव्यामध्ये कोठेही कसूर ठेवली नाही. आमदार शंभूराज देसाई यांच्या गाडीवरील फिल्मिंग काढण्यास त्यांनी मागे-पुढे पाहिले नाही. या जिगरबाज अधिकाऱ्याचीही साताऱ्यातील कारकीर्द सगळ्यांच्या लक्षात राहण्यासारखी आहे.
मेढा पोलीस ठाण्यातून सातारा शहर पोलीस ठाण्यात बदली झाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांनीही धडाकेबाज कामगिरी केली. खासगी सावकारीचे हिमनगर असलेल्या खंड्या धाराशिवकरवर पहिला गुन्हा चवरे यांनीच दाखल केला. त्यानंतरच खड्ड्याचे बरेच कारनामे समाजासमोर आले. चवरे यांची सध्या सांगली येथे बदली झाली आहे. अशा अधिकाऱ्यांमुळेच साताºयाची शांतता अबाधित राहिली आणि राहण्यास मदत होत आहे.