शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

राष्ट्रीय लोकअदालतीत ३ कोटी ३६ लाखांची वसुली

By admin | Published: December 14, 2015 10:20 PM

अनिता नेवसे : दोन हजार ७३३ प्रकरणे निकाली

सातारा : ‘जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये शनिवार, दि. १२ डिसेंबर रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकणातर्फे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दोन हजार ७३३ प्रकरणे निकाली काढण्यात आले असून, तीन कोटी ३६ लाख नऊ हजार ९८८ रुपयांची विक्रमी वसुली करण्यात आली आहे,’ अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सदस्य सचिव डॉ. अनिता नेवसे यांनी दिली.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा व सत्र न्यायालयात व ११ तालुका न्यायालयांच्या ठिकाणी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एम. गव्हाणे यांनी केले. यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे, जिल्हा न्यायाधीश ए. एन. पाटील, वर्षा मोहिते, व्ही. आर. कचरे, सर्व न्यायाधीश, वकील संघाचे अध्यक्ष अजय डांगे, जिल्हा सरकारी वकील एम. एन. कुलकर्णी, सरकारी वकील, बँका, विमा कंपन्यांचे पदाधिकारी तसेच सर्व यंत्रणांचे पदाधिकारी, पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.या राष्ट्रीय लोकअदालतीसाठी एकूण ११ पॅनेल तयार करण्यात आले होते. या पॅनेलमध्ये न्यायाधीश, वकील, प्राध्यापक यांच्या समन्वयामुळे मोठ्या रकमेची वसुली झाली. दिवाणी व फौजदारी प्रकरणे मिटविण्यासाठी पक्षकारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. ही राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी करण्यासाठी सर्व न्यायीक अधिकारी, विधीज्ञ, सरकारी वकील, प्राध्यापक, पक्षकार, न्यायालयीन कर्मचारी, पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)२६,४३७ वादपूर्व प्रकरणे प्रलंबितया राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये चलनक्षम दस्तऐवजांच्या १०७३ पैकी १९१, मोटार अपघात नुकसान भरपाईच्या २७१ पैकी ३४, वैवाहिक व कौटुंबीक वादाच्या ३६५ पैकी ४६, कामगार व औद्योगिक ६१ पैकी २० भूसंपादन ३२ पैकी ११, नगरपालिका घर मिळकतीची ९० पैकी २८, सहकार न्यायालयाची १९ पैकी १४, फौजदारी खटले व अपिले ४५७ पैकी ८०, दिवाणी दावे व अपिले ४७८ पैकी १३७, फौजदारी व किरकोळ गुन्ह्यांची प्रकरणे २०१ पैकी १६१, बँकांची वादपूर्व ११,१८८ पैकी १९७, वीज वितरण कंपनीकडील ६,९२१ पैकी ९६, भारत संचार निगम लिमिटेड व भ्रमणध्वनी कंपन्यांची १२,४०१ पैकी १०७५ इतकी प्रकरणे व ११ डिसेंबर रोजी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेंतर्गत ८३५ पैकी ६०३ अशी एकूण २९,१७० वादपूर्व व प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी २,७३३ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून, २६, ४३७ वादपूर्व प्रकरणे प्रलंबित आहेत.