शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

नवजा, महाबळेश्वरचा पाऊस एक हजारी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2021 4:26 AM

सातारा : जिल्ह्यात पावसाने दडी मारली असली तरी जूनमध्येच नवजा आणि महाबळेश्वरमधील पावसाने एक हजार मिलिमीटरचा टप्पा ओलांडला आहे. ...

सातारा : जिल्ह्यात पावसाने दडी मारली असली तरी जूनमध्येच नवजा आणि महाबळेश्वरमधील पावसाने एक हजार मिलिमीटरचा टप्पा ओलांडला आहे. तर पावसाची उघडीप असल्याने कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मंदावली आहे. सध्या धरणात ४२.४७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

जिल्ह्यात मागील १५ दिवसांपूर्वी पश्चिम भागात पावसाने दमदार हजेरी लावली होती. तसेच पूर्व भागातही काही ठिकाणी चांगला पाऊस झालेला. या पावसामुळे पश्चिम भागातील प्रमुख धरणांत चांगला पाणीसाठा झाला. कोयनासारख्या धरणात अवघ्या पाच दिवसांत १० टीएमसीवर पाणीसाठा वाढला होता. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामालाही सुरुवात केलेली. असे असतानाच गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणी खोळंबली आहे.

गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे अवघा ५ मिलिमीटर पाऊस पडला. तर जूनपासून ९२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नवजाला २२ तर या वर्षी आतापर्यंत १०८६ मिलिमीटर पर्जन्यमान झाले आहे. महाबळेश्वरला सकाळपर्यंत २८ तर जूनपासून १२४२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सकाळच्या सुमारास कोयना धरणात ४२.४७ टीएमसी एवढा पाणीसाठा झाला होता. तर २४३१ क्यूसेक वेगाने पाण्याची आवक होत होती. धरणाच्या पायथा वीजगृहातून होणारा विसर्ग तीन दिवसांपासून पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. दरम्यान, सातारा शहराबरोबरच पूर्व भागात ढगाळ वातावरण कायम आहे. त्याचबरोबर सूर्यदर्शनही होत आहे. पूर्व भागात पावसाअभावी खरीप हंगामातील पेरणीची कामे रखडली आहेत.

.......................................................