शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
2
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
3
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
4
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
5
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
6
IPL 2025 : राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय
7
'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट
8
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
9
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
10
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
11
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
12
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
13
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
14
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
15
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
16
Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' पाच ठिकाणी ठेवा दिवा; पितृकृपेबरोबरच होईल लक्ष्मीकृपा!
17
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
18
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"
19
५० सेकंदांची फी ५ कोटी, प्रायव्हेट जेटने प्रवास; 'ही' अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण
20
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?

सातारा जिल्ह्यातील नवजाला ७०, महाबळेश्वरला ६३ मिलिमीटर पावसाची नोंद 

By नितीन काळेल | Published: July 05, 2024 7:31 PM

कोयना धरणसाठ्यात एका दिवसात एक टीएमसीने वाढ

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून, २४ तासांत नवजाला ७० तर महाबळेश्वरला ६३ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणक्षेत्रातही पाऊस पडत असल्याने पाणीसाठा २५ टीएमसीवर पोहोचला आहे. धरणसाठ्यात एका दिवसात एक टीएमसीने वाढ झाली आहे.जुलै महिना सुरू झाल्यापासून पश्चिम भागात पावसाची चांगली हजेरी लागत आहे. कोयना, नवजा, महाबळेश्वरसह तापोळा, बामणोली, कांदाटी खोरे परिसरात सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे लोकांना सूर्यदर्शन होईनासे झाले आहे. त्यातच कोयना धरणक्षेत्रातही दमदार पाऊस होत आहे. यामुळे धरणातील पाणीसाठाही वाढू लागला आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक पाऊस कोयनानगर येथे ८५ मिलिमीटर झाला आहे. तर १ जूनपासून आतापर्यंत १ हजार २३२ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. त्याचबरोबर नवजा येथे यावर्षी आतापर्यंत १ हजार ३४७ आणि महाबळेश्वरमध्ये १ हजार १२९ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

पावसामुळे कोयना धरणात पाण्याची आवक टिकून आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास धरणात १२ हजार ४७६ क्युसेक वेगाने पाणी येत होते. तर धरण पाणीसाठा २५.३९ टीएमसी झाला होता. २४ तासांत धरणात एक टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. तर मागील १५ दिवसांपासून धरणातील विसर्ग बंद करण्यात आलेला आहे. पश्चिम भागातील या पावसामुळे कोयना नदीतील पाणीपातळीतही वाढ झाली आहे.

सातारा शहरात ढगाळ वातावरण..सातारा शहर आणि परिसरात तीन दिवसांपासून पावसाची हुलकावणी आहे. कधीतरी रिमझिम पाऊस होत आहे. नाहीतर सातारकरांना सूर्यदर्शन आणि ढगाळ वातावरणाचे दर्शन घ्यावे लागत आहे. शुक्रवारीही सकाळपासून ढगाळ वातावरण तयार झाले होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान