सातारा : नवरात्रोत्सव जवळ आल्याने जिल्ह्यात सर्वत्र दुर्गादेवीच्या स्थापनेसाठी लागणाऱ्या दुर्गामूर्ती तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे आहे. सातारा शहरातील कुंभारवाड्यात कारागिरांकडून मूर्तीवर शेवटचा हात फिरवण्याचे काम सुरू आहे. शहरातील अनेक मंडळांची देखील दुर्गामूर्ती प्रतिष्ठापणेसाठी मंडप उभारणीची कामेही जवळपास पूर्ण झाली आहेत.सध्या सातारा शहरातील कुंभारवाड्यात दुर्गामातेच्या विविध अशा आकर्षक मूर्ती बनविण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. तसेच सार्वजनिक मंडळांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही दांडिया, गरबासह अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यातआले आहे. शहरात महिलांसाठी विशेष स्पर्धा राबविल्या जातात. याकाळात देवीची नऊ रुपे पाहण्यासाठी भक्त गर्दी करत असतात. देवीचा मुखवठा उठावदार आणि आकर्षक करण्यासोबत डोळ्यांमध्ये जिवंतपणा आणण्यासाठी कारागीर अहोरात्र काम करताना पाहायला मिळत आहेत.प्रशासनाने पर्यावरणपूरक मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचे आवाहन मंडळांना केले असल्याने मूर्तिकार शाडू मातीच्या मूर्ती तयार करताना दिसत आहेत. दिवसेंदिवस शहरातील नवरात्रोत्सव मंडळांच्या संख्येत वाढ होत आहेत.शहरातील काही मंडळांनीदेखील उत्सवकाळात वेगवेगळ्या देखाव्यांवर भर दिला आहे. सध्या अनेक मंडळांकडून ३ ते १५ फुटांपर्यंत उंचीच्या मूर्ती बनविल्या आहेत. शहरातील गडकर आळी, बुधवार नाका येथील कुंभारवाड्यातमूर्ती बनविण्याचे काम वेगाने सुरू आहे.साहित्यांचीदुकाने सज्जदुर्गामातेच्या श्रृंगारासाठी लागणारे दागिने, शस्त्र व अन्य साहित्यांची दुकाने सज्ज झाली आहेत. तसेच सजावटीसाठी लागणारे साहित्यही मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. दुर्गामातेच्या प्रतिष्ठापणेसाठी काही दिवस उरले असल्याने व ऐनवेळी धावपळ होऊ नये, यासाठी मंडळांकडून आतापासूनच साहित्यांची खरेदी केली जाते. सातारा शहरातील बाजारपेठेत ग्रामीण भागातील नागरिकही मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी येतात. खरेदीविक्रीतून दरवर्षी कोट्यवधींची उलाढात होते.किमतीत वाढ झाल्याने प्लास्टर आॅफ पॅरिसकडे कलयंदा शाडू मातीच्या मूर्तींना मागणी असूनही किमतीत वाढ झाल्याने अनेक मंडळांचा कल प्लास्टर आॅफ पॅरीसच्या मूर्तीकडे आहे. दुर्गोत्सव मंडळांना वाहतुकीच्या दृष्टीने प्लास्टर आॅफ पॅरीसच्या मूर्ती शाडू मातीच्या मूर्तीपेक्षा सुकर पडतात. किमतीतही ३० ते ३५ टक्के फरक पडतो. किमतीत वाढ झाल्याने प्लास्टर आॅफ पॅरिसकडे कलयंदा शाडू मातीच्या मूर्तींना मागणी असूनही किमतीत वाढ झाल्याने अनेक मंडळांचा कल प्लास्टर आॅफ पॅरीसच्या मूर्तीकडे आहे. दुर्गोत्सव मंडळांना वाहतुकीच्या दृष्टीने प्लास्टर आॅफ पॅरीसच्या मूर्ती शाडू मातीच्या मूर्तीपेक्षा सुकर पडतात. किमतीतही ३० ते ३५ टक्के फरक पडतो.
नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2018 10:28 PM