शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

सांगली-साताऱ्याच्या जागेवर राष्ट्रवादीही ठाम

By admin | Published: October 23, 2016 12:12 AM

आघाडीत संघर्ष : दोन्ही जिल्ह्यातील नेत्यांची शरद पवारांशी चर्चा, संख्याबळानुसार नेत्यांचा आग्रह

सांगली : सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषदेच्या जागेवर काँग्रेसने दावेदारी सुरू केली असली तरी, राष्ट्रवादीचे नेतेही या जागेवर ठाम आहेत. शरद पवारांशी गुरुवारी मुंबईत झालेल्या चर्चेवेळीही सांगली-सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी संख्याबळाचा दाखला देत, ही जागा आपल्याकडेच ठेवण्याची जोरदार मागणी केली. त्यामुळे दोन्ही काँग्रेसमधील संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. विधानपरिषदेच्या या जागेवरून दोन्ही काँग्रेसचे नेते आक्रमक बनले आहेत. एका बाजूस पृथ्वीराज चव्हाण, पतंगराव कदम यांनी काँग्रेससाठी ही जागा मिळविण्यासाठी जोरदार ताकद लावली आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे दोन्ही जिल्ह्यातील दिग्गज नेतेही ही जागा न सोडण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. गुरुवारी शरद पवारांशी झालेल्या चर्चेवेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, सांगलीतून आ. जयंत पाटील, साताऱ्यामधून रामराजे नाईक-निंबाळकर, आ. शशिकांत शिंदे उपस्थित होते. दोन्ही जिल्ह्यातील नेत्यांनी काँग्रेसच्या एकतर्फी भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली. आघाडी करताना ही जागा राष्ट्रवादीला सोडण्याचा निर्णय झाला होता, हे अधोरेखित करत मतदारसंघात राष्ट्रवादी क्रमांक एकचा पक्ष असल्याने ही जागा ताकदीने लढविण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यासाठी २६ आॅक्टोबररोजी पुन्हा बैठक घेण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतला आहे. सांगली आणि सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व अधिक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारांची संख्याही काँग्रेसपेक्षा चाळीसने जास्त आहे. सांगली-सातारा विधानपरिषदेच्या जागेवर होणाऱ्या चुरशीच्या निवडणुकांना गतवेळी दोन्ही काँग्रेसमधील तडजोडीमुळे ब्रेक लागला. संख्याबळानुसार ही जागा काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रवादीला दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आता असलेले संख्याबळच गृहीत धरले जाणार असल्याने राष्ट्रवादीने संख्याबळाचा दाखला देत ही जागा आपलीच असल्याचे स्पष्ट केले आहे. काँग्रेसचे नेते पतंगराव कदम यांनी त्यांचे ज्येष्ठ बंधू मोहनराव कदम यांचा उमेदवारी अर्ज २७ रोजी दाखल करणार असल्याचे शनिवारी जाहीर केले. मोहनराव कदमांनीही आता माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे आघाडीत संघर्षाची ठिणगी पडली आहे. ती वेळीच विझवली जाणार की आणखी फुलवली जाणार, याकडे आता दोन्ही पक्षातील इच्छुक व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. अशा स्थितीत विधानपरिषदेच्या जागेवरून आघाडीत बिघाडीची चिन्हे दिसत आहेत. येत्या दोन दिवसात विधानपरिषदेच्या या जागेचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यानंतर उमेदवारी निश्चितीसाठी पक्षीय पातळीवर हालचाली होणार आहे. (प्रतिनिधी)हे तर अतिक्रमणच...आघाडी झाली त्यावेळी संख्याबळाचा विचार करून राष्ट्रवादीला ही जागा सोडण्यात आली होती. आजही संख्याबळाचा विचार केला तर सांगली-सातारा विधानपरिषद मतदारसंघात राष्ट्रवादीच क्रमांक एकचा पक्ष आहे. त्यामुळे अचानक काँग्रेसने या जागेवर दावेदारी करून उमेदवारीसाठी अर्ज भरण्याची तयारी करणे म्हणजे राष्ट्रवादीच्या जागेवरील अतिक्रमणच आहे, असे मत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार दिलीपतात्या पाटील यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. ते म्हणाले की, गेल्या चाळीस वर्षांपासून मी सार्वजनिक, राजकीय जीवनात कार्यरत आहे. सहकार क्षेत्रातील अनेक संस्थांचे प्रामाणिकपणे नेतृत्व केले. जिल्हा बँकेचा अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहे. त्यामुळे विधानपरिषदेसाठी मला संधी मिळावी, अशी अपेक्षा आहे. याबाबत पक्षाचे नेते जयंत पाटील आणि जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांच्याकडे रितसर मागणी केली आहे. याबाबत मी आशावादी आहे.तर्कवितर्कांना सुरुवातदोन्ही काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांनी स्वबळाच्या शक्यतेवरून तर्कवितर्क सुरू केले आहेत. काहींनी राष्ट्रवादीला ही निवडणूक सोपी असल्याचा दावा केला आहे, तर काहींच्या मते भाजप, शिवसेना, अपक्ष व अन्य सदस्यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. काँग्रेसने ताकद लावली तर काहीही घडू शकते. या मतदारसंघात आघाडी करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला होता. आता याच जागेवरून हे दोन्हीही नेते आपली प्रतिष्ठा पणाला लावताना दिसत आहेत. दोन्हीही नेत्यांनी दावेदारी करतानाच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे आग्रह धरला आहे.