सातारा : विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला अजून एक वर्षाचा कालावधी बाकी असला तरी राष्ट्रवादी व भाजपने मतदार नोंदणीच्या कार्यक्रमाला जोरदार सुरुवात केली आहे. या निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांनी मायक्रोप्लॅनिंग केले आहे.
राष्ट्रवादीकडून सारंग पाटील तर भाजपकडून सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर हे दोघे संभाव्य उमेदवार मानले जातात. दोन्ही नेत्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर हे पाच जिल्हे समाविष्ट आहेत. या पाचही जिल्ह्यांमध्ये इच्छुकांचे दौरे सुरु आहेत.या मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून गेलेले आमदार चंद्रकांत पाटील यांना भाजपने राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे महसूल खात्याचे मंत्रीपद दिले आहे.
पाटील यांची मुदत जुलै २0१९ मध्ये संपत आहे. ही निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची ठरणारी आहे. चंद्रकांत पाटील हे सलग दोन वेळा या मतदारसंघातून निवडून गेले आहेत. मागील निवडणूक २0१४ मध्ये झाली. भाजपचे चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे सारंग पाटील व राष्ट्रवादीचे बंडखोर अरुण लाड यांच्यात तिरंगी लढत झाली होती. राष्ट्रवादीची मते फुटल्याने सारंग पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.
सत्तेत असताना राष्ट्रवादीला बंडखोरी रोखता आली नव्हती, आता सत्तेबाहेर असणारी राष्ट्रवादी या निवडणुकीत एकसंध राहणार का? पुन्हा बंडखोरीचे वादळ घुमणार? यावरच राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा जय-पराजय अवलंबून ठरणार आहे. दरम्यान, सारंग पाटील यांनी राष्ट्रवादीच्या सर्वच कार्यक्रमांना हजेरी लावायला सुरुवात केली आहे. साताºयात नुकताच युवक राष्ट्रवादी काँगे्रसचा मेळावा झाला. या मेळाव्यात पाटील यांनी हजेरी लावून एकसंध राहण्याचे आवाहन केले. दुसऱ्या बाजूला सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनीही कºहाड तालुक्यात मतदाननोंदणीवर भर दिला आहे.पतसंस्थांवरही टार्गेटसाताऱ्यासह पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली या पाच जिल्ह्यांमध्ये पतसंस्थेचे मोठे जाळे आहे. या पतसंस्थांतील कर्मचाऱ्यांना मतदार नोंदणीचे टार्गेट पक्ष नेत्यांनी दिले आहे. त्यामुळे पतसंस्थेतील व्यवहारांसोबतच ‘ग्रॅज्युएट’ युवक-युवतींच्या मतदार नोंदणीचे कामही कर्मचाºयांना करावे लागत आहे.चंद्रकांत पाटील लढणार सार्वत्रिक निवडणूकमहसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. पक्ष ज्या ठिकाणी तिकिट देईल, तिथून निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.