सातारा : अत्यल्प पावसामुळे सातारा जिल्ह्यात भीषण दुष्काळाचे सावट पडले असले तरी राजकीय पदाधिकाऱ्यांच्या आरोप-प्रत्यारोपाचा मात्र भलताच सुकाळ झाल्याचे चित्र दिसू लागले आहे.‘सातारा जिल्ह्यातील दुष्काळ म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचेच पाप’ अशा भाषेत पालकमंत्री विजय शिवतारे यांनी टीकास्त्र सोडल्यानंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनीही शिवतारे यांच्यावर पलटवार केला आहे. त्यानंतर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष हर्षल कदम यांनीही सुनील माने यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.शरद पवार यांनी दुष्काळी भागात जावून जनतेला दिलासा दिला. त्याबाबत हा दौरा म्हणजे दुष्काळी पर्यटन अशी टिका करणाऱ्या पालकमंत्र्यांनीच दृष्काळ दौरा जाहीर केला आहे. तत्पूर्वी कोणतीही माहिती न घेता पालकमंत्री विजय शिवतारे यांनी अकलेचे तारे तोडले,’ अशी खरमरीत टिका राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी पत्रकाव्दारे केली आहे. ‘हिम्मत असेल तर पालकमंत्र्यांनी शासकीय खर्चाने दौरा न करता दुष्काळी भागात चारा व पाणी घेऊन जावे,’ असेही प्रतिआव्हान माने यांनी केले आहे. पालकमंत्री शिवतारे यांनी टीकात्मक स्वरूपात जनतेसमोर मांडले तर त्यात गैर काय? राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांनी पालकमंत्र्यांना फिरू न देण्याची भाषा म्हणजेच राष्ट्रवादीची या निमित्ताने टगेगिरी पुन्हा जनतेसमोर आली आहे,’ अशी टीका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी केली. दुष्काळी जनतेने त्यांचे अश्रू पुसण्यासाठी पवार त्यांना खासदार म्हणून लोकसभेत पाठविले, हेच सर्व सत्य पालकमंत्री शिवतारे यांनी टीकात्मक स्वरूपात जनतेसमोर मांडले तर त्यात गैर काय? या निमित्ताने टगेगिरी पुन्हा जनतेसमोर आली आहे,’ अशी टीका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी केली. (प्रतिनिधी)
्नराष्ट्रवादी-शिवसेना जिल्हाध्यक्षांमध्ये जुंपली!
By admin | Published: September 07, 2015 9:10 PM