सातारा : आमदार सांभाळण्यासाठी शासनाच्या तिजोरीवरती सरकारने दरोडा टाकलेला आहे. शिंदे आणि फडणवीस सरकार आल्यापासून विकास निधीबाबत अन्याय तर झाला आहेच पण विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम केले जात आहे. याच्या निषेधार्थ सातारा जिल्हाधिकारी 23 तारखेला निषेध लाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली.
येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शाशिकांत शिंदे म्हणाले, सातारा जिल्हा हा यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा जिल्हा आहे. या जिल्ह्याचे नेतृत्व अनेकानी केले आहे. पण सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे राजकारण जिल्ह्यात झाले आहे. मात्र, सध्याच्या स्थिसरकारच्या काळात विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. विकास निधी बाबत राजकारण केले जात आहे, प्रशासकीय अधिकारी निःपक्षपाती पणे काम करत नाहीत. याचा निषेधार्थ बॉम्बे रेस्टॉरंट ते जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेधकाठी मोर्चा काढण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगीतले.