दहिवडी : ‘माणमध्ये निवडणूक झालेल्या एकसष्टपैकी चौतीस ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीची सत्ता आली आहे. मतदारांनी राष्ट्रवादीला भरभरून साथ दिली आहे,’ असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
देशमुख म्हणाले, ‘माणमधील निवडणूक लागलेल्या ६१ पैकी चौदा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. या ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी मी व्यक्तिशः प्रयत्न केले. त्यामुळे या चौदापैकी दहा ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने यश मिळविले. बिनविरोध झालेल्या इंजबाव, गंगोती, जाशी, तोंडले, भाटकी, मार्डी, मोही, लोधवडे, वाकी व हवालदारवाडी या ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराच्या आहेत, तर निवडणूक झालेल्या ४७ पैकी २४ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीची सत्ता आली आहे. काळचौंडी, किरकसाल, कुकुडवाड, खडकी, गटेवाडी, गोंदवले खुर्द, गोंदवले बुद्रुक, जांभुळणी, डंगिरेवाडी, दिवडी, देवापूर, धामणी, पळसावडे, पानवण, पिंगळी बुद्रुक, भालवडी, रांजणी, वडजल, वर-म्हसवड, शिंदी खुर्द, शिंदी बुद्रुक, शिरवली व शेनवडी या ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने समविचारी पक्षांना बरोबर घेऊन वर्चस्व मिळविले आहे. माणमधील सुज्ञ मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना भरभरून साथ दिली व मतरूपी आशीर्वाद दिला, त्याबद्दल सर्व मतदारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आभारी आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच गावोगावी विकास योजना राबवून मतदारांचा विश्वास आम्ही नक्कीच सार्थ ठरवू, असा विश्वास व्यक्त केला.