शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

राष्ट्रवादी युवकच्या कार्यकर्त्यांनी दरासाठी रस्त्यावर ओतले कांदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 2:52 PM

कांद्याला चांगला दर देण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी सातारा-कोरेगाव रस्त्यावर कांदे ओतून निषेध व्यक्त केला.

सातारा : कांद्याला चांगला दर देण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी सातारा-कोरेगाव रस्त्यावर कांदे ओतून निषेध व्यक्त केला. यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. यावेळी जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे यांच्यासह १३ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे साताºयातील नियोजित कार्यक्रमासाठी सकाळी अकराच्या सुमारास सैनिक स्कूलच्या मैदानावर हेलिकॉप्टरमधून उतरले. यावेळी त्यांच्याबरोबर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेही होते. यादरम्यान, कार्यक्रमस्थळाशेजारीच सातारा-कोरेगाव रस्ता आहे. या रस्त्यावरच कांद्याला मिळालेले अनुदान कमी आहे, कांद्याला दर चांगला मिळावा, अशी घोषणा देत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते आले. त्यानंतर या सर्वांनी घोषणा देत रस्त्यावरच कांदा ओतला. यामुळे तेथे बंदोबस्तासाठी असणाºया पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते घोषणा देत असतानाच पोलिसांनी सर्वांनाच ताब्यात घेतले. यामध्ये जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, बाळासाहेब महामूलकर यांचा समावेश होता. त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्यात आणले. दुपारपर्यंत सर्वजण पोलीस ठाण्यातच होते.