शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

राष्ट्रवादीची प्रतिष्ठा तर काँग्रेसचे अस्तित्व पणाला

By admin | Published: November 16, 2016 11:14 PM

मोहनराव कदम यांच्यासाठी समविचारी एकत्र

सातारा : विधानपरिषदेच्या सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे उमेदवार शेखर गोरे यांच्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांची फळी जोरदार कामाला लागली आहे. काँगे्रसतर्फे नात्या-गोत्यांचे गणित मांडले गेले तरी पक्षाची भूमिका महत्त्वाची असे स्पष्ट करत राष्ट्रवादीचे सर्वच आमदार मते फुटू नयेत, याची मोठी काळजी घेताना पाहायला मिळत आहेत. जिल्ह्याच्या राजकारणावर असलेली राष्ट्रवादीची पकड ढिली न होऊ देता, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असणाऱ्या ताकदीच्या बळावर राष्ट्रवादीने काँगे्रसपुढे आव्हान उभे केले आहे. म्हसवड, पाचगणी पालिका व मलकापूर नगरपंचायत वगळता सातारा, वाई, फलटण, कऱ्हाड, महाबळेश्वर, रहिमतपूर या पालिकांत तसेच लोणंद नगरपंचायतीत पालिकेची सत्ता आहे. या सर्वच पालिकांमध्ये काँगे्रसचे बळ राष्ट्रवादीच्या तुलनेत कमी आहे. जिल्हा परिषदेतही ६७ पैकी ३७ सदस्य राष्ट्रवादीचे आहेत. विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्यावरच राष्ट्रवादीची मदार असून या नेत्यांच्या ताब्यातच बहुतांश सत्तास्थाने असल्याने त्यांनी मते फुटू नयेत, याची विशेष काळजी घेतल्याचे चित्र सध्या आहे. या मतदारसंघासाठी जिल्ह्यात ३0४ मतदार आहेत. यापैकी बहुतांश मतदान खेचण्यासाठी शेखर गोरे यांनी ‘व्यूव्हरचना’ आखली आहे. (प्रतिनिधी)

मोहनराव कदम यांच्यासाठी समविचारी एकत्रसातारा : सांगली-सातारा विधानपरिषदेचे कॉग्रेसचे उमेदवार मोहनराव कदम यांच्या प्रचाराच्या निमित्ताने जिल्ह्यातील काँग्रेस एकवटली आहे. जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटीवर भर दिला असून प्रचाराच्या तीन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. यावेळी मोहनराव कदम यांना जिल्ह्यातून मताधिक्य देण्याचा निर्धार काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे.डॉ. पतगंराव कदम आणि मोहनराव कदम यांनी नेहमीच पक्षाची कवाडे बाजूला ठेवून शैक्षणीक व सामाजिक क्षेत्रात सर्वपक्षीय नेत्यांना व कार्यकर्त्यांना सहकाऱ्याची भुमिका घेतल्याने त्याचा फायदा मिळेल, असा दावा काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. दरम्यान, सांगलीतील विशाल पाटील गटानेही कदम यांना पाठींबा जाहीर केला आहे.मोहनरावांसाठी सातारा जिल्ह्यातून काँग्रेसच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ. जयकुमार गोरे, आ. आनंदाराव पाटील, माजी आमदार मदनदादा भोसले, अ‍ॅड. विजयराव कणसे, जिल्हा सरचिटणीस व माजी शिक्षण सभापती सुनिल काटकर, रणजीतसिंह नाईक-निंबाळकर, भिमरावकाका पाटील, हिंंदुराव पाटील, प्रल्हाद साळुंखे-पाटील, धैर्यशिल कदम, डॉ. सुरेश जाधव, ज्येष्ठ नेते शंकराव गाढवे, अ‍ॅड. बाळासाहेब बागवान, गुरूदेव बरदाडे, अविनाश नलवडे, विजय भिलारे, सतीष भोसले, नंदाभाऊ जाधव, बाबासाहेब कदम यांच्यासह नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी प्रचाराचा धुरळा उडविला आहे. (प्रतिनिधी)