शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

राष्ट्रवादीची प्रतिष्ठा तर काँग्रेसचे अस्तित्व पणाला

By admin | Published: November 16, 2016 11:11 PM

ंशेखर गोरेंसाठी नेत्यांची फळी कामाला...

 सातारा : विधानपरिषदेच्या सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे उमेदवार शेखर गोरे यांच्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांची फळी जोरदार कामाला लागली आहे. काँगे्रसतर्फे नात्या-गोत्यांचे गणित मांडले गेले तरी पक्षाची भूमिका महत्त्वाची असे स्पष्ट करत राष्ट्रवादीचे सर्वच आमदार मते फुटू नयेत, याची मोठी काळजी घेताना पाहायला मिळत आहेत. जिल्ह्याच्या राजकारणावर असलेली राष्ट्रवादीची पकड ढिली न होऊ देता, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असणाऱ्या ताकदीच्या बळावर राष्ट्रवादीने काँगे्रसपुढे आव्हान उभे केले आहे. म्हसवड, पाचगणी पालिका व मलकापूर नगरपंचायत वगळता सातारा, वाई, फलटण, कऱ्हाड, महाबळेश्वर, रहिमतपूर या पालिकांत तसेच लोणंद नगरपंचायतीत पालिकेची सत्ता आहे. या सर्वच पालिकांमध्ये काँगे्रसचे बळ राष्ट्रवादीच्या तुलनेत कमी आहे. जिल्हा परिषदेतही ६७ पैकी ३७ सदस्य राष्ट्रवादीचे आहेत. विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्यावरच राष्ट्रवादीची मदार असून या नेत्यांच्या ताब्यातच बहुतांश सत्तास्थाने असल्याने त्यांनी मते फुटू नयेत, याची विशेष काळजी घेतल्याचे चित्र सध्या आहे. या मतदारसंघासाठी जिल्ह्यात ३0४ मतदार आहेत. यापैकी बहुतांश मतदान खेचण्यासाठी शेखर गोरे यांनी ‘व्यूव्हरचना’ आखली आहे. (प्रतिनिधी)