वाई : सततची पेट्रोल-डिझेल दरवाढ व खताचे वाढलेले दर यांच्या विरोधात वाई येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तहसीलदार रणजित भोसले यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी उपसभापती विक्रांत डोंगरे म्हणाले, ‘गेल्या एक वर्षापासून कोरोनाच्या भयंकर संकटामुळे जनता मेटाकुटीला आली आहे. सततच्या लॉकडाऊनमुळे व्यावसायिक, शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. आवक थांबल्यामुळे नागरिक आर्थिक संकटात आहेत. अशात सतत पेट्रोल, डिझेलचे वाढते भाव सर्वसामान्यांची डोकेदुखी वाढवीत आहेत. पेट्रोल-डिझेल वाढीमुळे महागाई वाढते, याचे चटके सर्वसामान्यांना बसतात, तसेच पेरणीच्या हंगामाच्या तोंडावर खताचे वाढलेले भाव हे अन्यायकारक आहेत.
केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व शेतीतील खतांच्या दरवाढीबाबत केंद्र सरकारचा निषेध म्हणून राष्ट्रवादी युवकच्या वतीने वाई तहसीलदार कार्यालयात तहसीलदार रणजित भोसले यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वाई तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष व वाई पंचायत समिती उपसभापती विक्रांत डोंगरे, राष्ट्रवादी लिगल सेलचे ॲड. रवींद्र भोसले, शहराध्यक्ष प्रसाद देशमुख, वाई तालुका युवक सचिव व बाजार समिती संचालक कुमार जगताप, प्रसिद्धीप्रमुख श्रीधर भाडळकर यांच्यासह युवक उपस्थित होते.