शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
2
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
3
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
4
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
5
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
6
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
7
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
8
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
9
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
10
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
11
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
12
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
13
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
14
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
15
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
16
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
17
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
18
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
19
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
20
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एनडीआरएफचे पथक सातारा जिल्ह्यात दाखल

By नितीन काळेल | Published: July 02, 2024 6:20 PM

पश्चिम भागात पाऊस वाढला : ३० जणांचा समावेश; पावसाळ्यात कार्यरत राहणार 

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढत चालल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. त्यामुळे मदतीसाठी एनडीआरएफचे (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल) ३० जणांचे पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे. हे पथक संपूर्ण पावसाळ्यात कार्यरत असणार आहे. तसेच आपत्तीच्या काळात मदतही करणार आहे.जिल्ह्यात तीन वर्षांपूर्वी धुवाधार पाऊस झाला होता. यामुळे कोयना, कृष्णा, नीरा आदी नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली होती. तर काही नद्यांच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली होती. पाणी पात्राबाहेर पडलेले. त्याचबरोबर पश्चिम भागात अनेक ठिकाणी दरडी कोसळून गावावर आल्या होत्या. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले. त्यामुळे जिल्हा प्रशासन पावसाळ्यापूर्वी विविध उपाययोजना करते. तसेच नागरिकांच्या जीविताचीही काळजी घेते. यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक बोलवण्यात येते. यावर्षीही हे पथक आले आहे.सध्या पथक कऱ्हाडमध्ये आहे. पावसाळ्याच्या काळात पथक कार्यरत राहणार आहे. तसेच पूरप्रवण आणि नागरिकांना धोका निर्माण होईल अशा ठिकाणी मदतीसाठी जाणार आहे. त्यातच कऱ्हाड येथे कोयना आणि कृष्णा नदीचा संगम होतो. त्यामुळे अतिवृष्टीत कृष्णा नदीला पूर येतो. अशा काळात या पथकाची मोठी मदत होणार आहे.जिल्हा प्रशासनाने नदीकाठची संभाव्य पूरप्रवण गावे निश्चित केली आहेत. यामध्ये सर्वाधिक गावे ही कऱ्हाड तालुक्यात ५५ आहेत. तर जिल्ह्यात १७२ गावांना पुराचा धोका राहतो. या गावांवर प्रशासनाचे लक्ष राहणार आहे. तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलही पूरस्थितीच्या काळात दक्ष असणार आहे.

पथकात दोन पोलिस निरीक्षक दर्जाचे अधिकारी..कऱ्हाडमध्ये दाखल झालेल्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकात ३० जणांचा समावेश आहे. ही तुकडी पुणे येथून आलेली आहे. त्यांच्याबरोबर पूरस्थितीत मदत करण्यासाठी लागणारे साहित्यही आहे. या पथकात पोलिस निरीक्षक दर्जाचे दोन अधिकारी आहेत. टीम कमांडर सुजीत पासवान, निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक असेल. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने मागील महिन्यातच नदीकाठच्या रहिवाशांसाठी पूरस्थितीतील धोका टाळण्यासाठी प्रशिक्षण घेतले होते. यामध्ये पोलिस, होमगार्ड आदी सहभागी झालेले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसfloodपूर