शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; सूचक विधान करत म्हणाले, “मतदानाचा टक्का...”
3
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
4
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
5
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
6
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
7
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
8
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
9
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
10
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
11
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
12
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
13
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
14
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
15
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
16
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
17
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
18
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
19
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
20
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...

शेतीला प्रगत तंत्रज्ञानाची गरज

By admin | Published: March 25, 2016 10:22 PM

शिवेंद्रसिंहराजे भोसले : राज्यस्तरीय अजिंंक्य कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन

सातारा : ‘आजच्या स्पर्धेच्या युगात शेती व्यवसायात आमुलाग्र बदल होत आहेत. पारंपरिक शेती चालत नाही, हे शेतकऱ्यांना उमगले आहे. कमी खर्चात आणि कमी क्षेत्रात जास्तीत-जास्त उत्पादन मिळाले तरच शेती व्यवसाय फायदेशीर ठरणार आहे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, खते, बी-बियाणे, अवजारे यांचा वापर शेती व्यवसायात करणे ही काळाची गरज आहे,’ असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंंहराजे भोसले यांनी केले. येथील जिल्हा परिषद मैदानावर बाजार समितीच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय अजिंंक्य कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, उपाध्यक्ष रवी साळुंखे, शिक्षण व अर्थ समितीचे सभापती सतीश चव्हाण, सदस्य राजू भोसले, किरण साबळे-पाटील, जितेंद्र सावंत, पंचायत समितीच्या सभापती कविता चव्हाण, सदस्य आनंदराव कणसे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, माजी सभापती सुनिल काटकर, नगरपरिषदेचे उपाध्यक्ष जयवंत भोसले, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सहायक निबंधक श्रीकांत श्रीखंडे, बाजार समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. विक्रम पवार, उपाध्यक्ष बाबासाहेब घोरपडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार शिवेंद्रसिंंहराजे भोसले म्हणाले, ‘आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच सातारा बाजार समितीने नावीन्यपूर्ण असे कृषीप्रदर्शन भरवले आहे. शुअर शॉटचे संदीप गिड्डे यांनी नेटके संयोजन केल्याने प्रदर्शनाला शिस्तबद्धता आल्याचे दिसत आहे.शेती व्यवसायाच्या वृद्धीसाठी, शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्तीत-जास्त उत्पन्न कसे मिळेल, याची माहिती उपलब्ध होण्यासाठी अशा प्रदर्शनांची नितांत आवश्यकता आहे. काही दिवसांपूर्वी ठिबक सिंचन चालत नाही, अशी परिस्थिती होती. ती परिस्थिती आमुलाग्र बदलामुळे बदलली असून, आता ठिबक फायद्याचे ठरत आहे. पाण्यासह खर्चात आणि वेळेत बचत होत आहे. अशा प्रदर्शनाला भेटी देऊन शेतकऱ्यांनी शेतीतील नवीन तंत्रज्ञान, योजना, मशागतीची नवीन साधने, उपकरणे आदींची माहिती घेऊन त्याचा वापर करावा.’ यावेळी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी मनोगत व्यक्त केले. आमदार शिवेंदसिंहराजे भोसले यांच्या हस्ते शुअर शॉटचे संदीप गिड्डे, शिक्षण सभापती चव्हाण, अ‍ॅड. लालासाहेब पवार यांचा सत्कार करण्यात आला.मान्यवरांच्या हस्ते जपान कुबोटा तंत्रज्ञानाच्या अत्याधुनिक पॉवर टिलरचे लॉचिंंग करण्यात आले. सुजित शेख यांनी सूत्रसंचालन केले. काका धुमाळ यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)